ढगाळ वातावरणामुळे लोक हैराण, राज्यात उष्णता वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 02:01 PM2024-04-19T14:01:57+5:302024-04-19T14:03:22+5:30
राज्यात गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने उष्णता आणि आर्द्रता वाढली आहे.
नारायण गावस, पणजी: राज्यात गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने उष्णता आणि आर्द्रता वाढली आहे. राज्यातील काही भागात उष्णता ३५ अंश सेल्सियस पर्यंत पोहचली आहे. हवामान खात्याने राज्यात पुढील काही दिवसांत तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सियस पर्यंत जाण्याची शक्यता वर्तविली आहे.
ढगाळ वातावरण डोकेदुखी-
ढगाळ वातावणामुळे अनेकांना डोकेदुखी उल्टी तसेच इतर आजार वाढले आहेत. गेेले चार दिवसांपासू्न राज्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जाते पण पााऊस न पडता उष्णतेत वाढ होत आहे. तसेच या ढगाळ वातावणामुळे आर्द्रता वाढली आहे. याचा परिणाम लोकांच्या थेट आरोग्यावर जाणवत आहे. अनेकांना सध्या उल्टी जोर तसेच डोकेदुखी सारखे आजार वाढले आहे. लोक पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
उष्णतेत प्रचंड वाढ-
राज्यातील एप्रिल महिना सुरु झाल्यापासून उष्णता वाढली तर पुढील आठवड्यात उष्णतेत आणखी भर पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. राज्यात कमाल तापमान ३५ अंश वर गेले आहे तर किमान तापमान २९ अंश पर्यंत आहे. यात आणखी वाढ होऊन ३६ अंश सेल्सियसवर जाणार आहे. असे हवामान खात्यातर्फे कळविण्यात आले आहे. त्यामुळे या उष्णतेतून बचाव करण्यासाठी आरोग्य खाते हवामान खात्याने विविध सुचना जारी केल्या आहेत.