मावळत्या वर्षात मडगाव अग्निशमक दलाने वाचविली २१ कोटी ५ लाखांची मालमत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 11:02 AM2019-12-25T11:02:17+5:302019-12-25T11:03:34+5:30

दलाच्या जवानांनी आपले प्राण धोक्यात घालून आगीपासून एकाला बचावले तर अन्य घटनेत एकूण ४८ जणांना जीवदान दिले.

During the current year, the Madgaon fire brigade saved 21 crore 5 lakh properties | मावळत्या वर्षात मडगाव अग्निशमक दलाने वाचविली २१ कोटी ५ लाखांची मालमत्ता

मावळत्या वर्षात मडगाव अग्निशमक दलाने वाचविली २१ कोटी ५ लाखांची मालमत्ता

Next

मडगाव: गोव्यातील दक्षिण विभाग मडगाव अग्निशामक दलाने यंदाच्या वर्षी विविध घटनांमध्ये तब्बल २१ कोटी ५ लाख ९१ हजार ७५0 रुपयांची मालमत्ता बचाविली १ जानेवारी ते २२ डिसेंबर पर्यंतची ही आकडेवारी आहे. या दरम्यान एकूण ९४७ आगीच्या दुर्घटनेचे कॉल्सची नोंद असून, त्यातील २४ प्रकरणे तातडीची होती. तातडीची व अन्य दुघर्टनेची एकूण १७0५ कॉल्सची नोंद असूनण विविध घटनांमध्ये अग्निशामक दलाच्या जवानांनी एकूण ४९ जणांचे प्राण वाचविल्याची माहिती अग्निशामक दलाचे उप संचालक नितिन व्ही. रायकर यांनी दिली.


दलाच्या जवानांनी आपले प्राण धोक्यात घालून आगीपासून एकाला बचावले तर अन्य घटनेत एकूण ४८ जणांना जीवदान दिले. आगीच्या घटनांपासून १७, ९३,६६,९६१ मालमत्तेचे सरंक्षण तर अन्य दुर्घटनेत एकूण ३,१२,२४,७८९ मालमत्ता वाचविण्यात दलांच्या जवानांना यश आले.


वर्षाच्या सुरुवातीला १ जानेवारी रोजी पोंचवाडा - बेताळभाटी येथे माडांच्या झावळयांच्या शेडलवा आग लागण्याची घटना घडली होती. दलाच्या जवानांनी या दुर्घटनेत एकूण पाच लाखांची मालमत्ता बचाविवी तर मालभाट येथे एकाला घराला आग लागली असता दोन लाखांची मालमत्ता वाचविली होती. जानेवारी महिन्यातच आगाळी येथे एका जनरल स्टोअरला आग लागण्याची घटना घडली. जवानांनी १५ कोटींची मालमत्ता वाचविली तर फेब्रुवारी महिन्यात कुंकळळी येथील औदयोगिक वसाहतीतील मेसर्स बोट क्राफ्ट फॅक्टरीला आग लागली होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी या दुर्घटनेत एकूण तीन कोटींची मालमत्ता वाचविली होती. फेब्रुवारीत नेसाय येथे एका दुर्घटनेही दलाच्या जवानांनी तीन कोटींची मालमत्तेचे सरंक्षण केले होते. नोव्हेंबर महिन्यात वेर्णा येथील औदयोगिक वसाहतीत जेट एमआयजी २९ के एअरक्राफ्ट पडले होते. दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाउन स्थिती हाताळली होती.

Web Title: During the current year, the Madgaon fire brigade saved 21 crore 5 lakh properties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.