गोव्यात निवडणूक आचारसंहिता काळात दारू, ड्रग्स मिळून ३ कोटी ८४ लाखांचा माल जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 10:05 PM2019-04-04T22:05:36+5:302019-04-04T22:06:29+5:30

वाणिज्य कर आयुक्तालयाचे अधिकारी आदी वेगवेगळ्या यंत्रणांनी रोख, दारु, ड्रग्स व अन्य किंमती वस्तू मिळून ३ कोटी ८४ लाख २0 हजार ८९८ रुपयांचा माल जप्त केला.

During Goa election code of ethics seized liquor and drugs worth 3 crores 84 lakhs | गोव्यात निवडणूक आचारसंहिता काळात दारू, ड्रग्स मिळून ३ कोटी ८४ लाखांचा माल जप्त 

गोव्यात निवडणूक आचारसंहिता काळात दारू, ड्रग्स मिळून ३ कोटी ८४ लाखांचा माल जप्त 

Next

पणजी : गोव्यात निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंतच्या काळात अबकारी अधिकारी, पोलिस, आयोगाचे अधिकारी, वाणिज्य कर आयुक्तालयाचे अधिकारी आदी वेगवेगळ्या यंत्रणांनी रोख, दारु, ड्रग्स व अन्य किंमती वस्तू मिळून ३ कोटी ८४ लाख २0 हजार ८९८ रुपयांचा माल जप्त केला. ४३२२ शस्रास्रे जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये जमा झाली. दोन शस्रास्रे व १२ काडतुसे जप्त करण्यात आली. 

आचारसंहिता भंगाच्या ३0 तक्रारी आल्या त्यातील १३ तक्रारी सीव्हिजिल अ‍ॅपच्या माध्यमातून आल्या. ७ तक्रारी टपालाव्दारे व इमेलच्या माध्यमातून आल्या. सुभाष शिरोडकर यांच्या बँक खात्यात आचारसंहिता लागू असतानाही रक्कम जमा केली गेल्याची तसेच सरकारात दोन उपमुख्यमंत्री नियुक्त केल्याच्या काँग्रेसने केलेल्या दोन तक्रारींवर चौकशी करुन अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवण्यात आला आहे. सूत्रांनी यास दुजोरा दिला. अन्य तक्रारी किरकोळ स्वरुपाच्या असल्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण सावंत यांनी सांगितले. 

---------------------------------------

एकूण रोख जप्त :  ७५.१८ लाख रुपये 

मद्य जप्त   : २ कोटी ८६ लाख ७0 हजार रुपये

ड्रग्स जप्त : २२.१७ लाख रुपये

एकूण माल जप्त : ३ कोटी ८४ लाख २0 हजार ८९८ रुपये 

............................
मालमत्ता विद्रुपीकरणाची २६७२ प्रकरणे 

निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतरच्या काळात मालमत्ता विद्रुपीकरणाची २६७२ प्रकरणे नोंद झाली. बॅनर, पोस्टर्स किंवा अन्य प्रकारे केलेली ही विद्रुपीकरणे हटविण्यात आली. सार्वजनिक मालमत्तेत २३५५ ठिकाणी तर खाजगी मालमत्तेत ३२७ ठिकाणी विद्रुपीकरण केल्याचे आढळून आले. 

सोशल मिडियासाठी नोडल अधिकारी म्हणून आयटी खात्याचे उपसंचालक प्रवीण वळवटकर यांची नियुक्ती केली आहे. आचारसंहिताभंगाच्या तक्रारीही तेच हाताळत आहेत. फेसबूक, व्टीटर, यु टयुब आदी सोशल मिडियावर ते नजर ठेवून आहे. खोट्या बातम्या, व्देष पसरविणारी भाषणे पावर करडी नजर ठेवण्यात येत आहे. आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी सीव्हीजिल अ‍ॅपव्दारे पाठवण्याची सोय आहे. निवडणूक प्रक्रिया, उमेदवार, प्रतिज्ञापत्रेही मतदार हेल्पलाइनवरुन उपलब्ध आहेत. 

निवडणूक काळात रिव्हॉल्वर, पिस्तुले तसेच अन्य शस्रास्रे जिल्हाधिका-यांकडे जमा करावी लागतात. अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण सावंत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ‘शस्रास्रे जमा न करणाºयांना जिल्हाधिकारी कारणे दाखवा नोटिसा बजावून कारवाई करीत असतात. बँकांमध्ये काम करणारे सेक्युरिटी तसेच ज्यांच्या जिवाला धोका आहे आणि स्वबचावासाठी नितांत गरज आहे त्यांनी तसे पटवून दिल्यास मुभा असते.’ उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी विकास गावणेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ‘सहसा कोणी शस्रास्रे जमा करण्याचे टाळत नाही. काही परवानाधारक मृत पावलेले असतात, काही विदेशात असतात. ज्यांनी जमा केलेली नाहीत अशी १२ प्रकरणे उत्तर गोव्यात असावीत त्यांना कारणे दाखवा नोटिसा पाठवल्या जातील.’ लोकसभेसाठी एकूण ११ लाख ३१ हजार ६१८ मतदार असून १६५२ मतदान केंद्रे आहेत.

Web Title: During Goa election code of ethics seized liquor and drugs worth 3 crores 84 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.