पर्पल फेस्ट दरम्यान आयोजकांनी घेतली पर्पल दूतांची भेट
By समीर नाईक | Published: January 11, 2024 05:37 PM2024-01-11T17:37:23+5:302024-01-11T17:37:54+5:30
पर्पल फेस्ट दरम्यान राज्य दिव्यांगजन आयुक्त आणि महोत्सवाच्या प्रमुख मान्यवरांनी पर्पल दूतांची भेट घेतली.
समीर नाईक,पणजी: पर्पल फेस्ट दरम्यान राज्य दिव्यांगजन आयुक्त आणि महोत्सवाच्या प्रमुख मान्यवरांनी पर्पल दूतांची भेट घेतली. मिशन अॅक्सीसिबिलिटीद्वारे संकल्पित या उपक्रमाचा उद्देश सर्वसमावेशक भारतासाठी सहयोग वाढविणे आणि या चळवळीचा आवाज बुलंद करणे हा होता. या कार्यक्रमात गोव्याचे समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, माजी सरन्यायाधीश यू यू ललित, मिशन अॅक्सेसिबिलिटीचे संस्थापक राहुल बजाज, सहसंस्थापक अमर जैन व सल्लागार तुराब चिमंथनवाला यांसारख्या प्रतिष्ठित पाहुण्यांसह देशभरातील ११ राज्यांचे दिव्यांगजन आयुक्त सहभागी झाले होते.
शासकीय धोरण आणि प्रत्यक्ष अनुभव यामधील अंतर कमी करण्याचा उद्देश या उपक्रमामागचा होता. खुल्या चर्चेद्वारे, सहभागींनी दिव्यंगत्व संस्कृतीच्या विविध गोष्टींबद्दल आयुक्तांना माहिती देऊन पूर्वग्रह दूर करत समानुभूती वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी सर्वसमावेशकेतबाबतच्या अडथळ्यांवरही चर्चा केली.
गोव्याच्या पर्पल दूतांचा समावेश एकूण २२ दूतांचा या पर्पल फेस्त मध्ये सहभाग आहे. यातील ४ दुत हे गोव्यातील आहेत. या वेळी या चारही दुतांशी त्यांनी चर्चा केली. महत्वाचे म्हणजे यावेळी हुमन लायब्ररी चे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत सदर दुत आपले अनुभव लोकांशी शेअर करत आहे