दूरदर्शन व खाजगी चॅनलच्या सहाय्याने शिक्षण; मुख्यमंत्र्यांचे गोवा विधानसभेत सुतोवाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 02:27 PM2020-07-27T14:27:25+5:302020-07-27T14:27:58+5:30

शैक्षणिक मार्गदर्शक तत्वांनुसार शैक्षणिक संस्था सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे काय असा प्रश्न आमदार सुदिन ढवळीकर यांनी केला होता.

Education through television and private channels; The Chief Minister's speech in the Goa Legislative Assembly | दूरदर्शन व खाजगी चॅनलच्या सहाय्याने शिक्षण; मुख्यमंत्र्यांचे गोवा विधानसभेत सुतोवाच

दूरदर्शन व खाजगी चॅनलच्या सहाय्याने शिक्षण; मुख्यमंत्र्यांचे गोवा विधानसभेत सुतोवाच

Next

पणजीः शैक्षणिक वर्गासाठी दूरदर्शन आणि खाजगी चॅनलच्या सकाऱ्यांने उपक्रम सुरू करण्याच्या तयारीत सरकार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिली. 

शैक्षणिक मार्गदर्शक तत्वांनुसार शैक्षणिक संस्था सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे काय असा प्रश्न आमदार सुदिन ढवळीकर यांनी केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.  मुले कॉपी करणार नाहीत कशावरून हा प्रश्नही त्यांनी विचारला होता. गोवा दूरदशर्नचा शिक्षणासाठी वापर करण्याच्या शक्यतेवर सरकार विचार करीत आहे. त्यासाठी दुरदर्शनसह खाजगी टीव्ही चनलच्या सहकार्य घेण्याचीही तयारी चालविली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी दिली. 

विद्यार्थी घरून परीक्षा देताना कॉपी करण्याच्या शक्यतेविषयी माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी तशी शक्यता असल्याचे सांगितले, परंतु गोवा विद्यापीठ ही परीक्षा घेत असल्यामुळे विद्यापीठ या विषयी योग्य काळजी घेणार असल्याचे सांगितले. विद्यापीठ स्वायतत्त संस्था असल्यामुळे त्यांना सरकार आदेश करू शकत नाही, परंतु काही सूचना करणे शक्य अस्याचे त्यांनी सांगितले. विरोधीपक्षनेते दिगंबर कामत यांनी कनेक्टीविटीसाठी ऑप्टीकल फायबर केबलच्या मदतीने इन्ट्रानेट वापरून त्याचा शैक्षणिक वर्गासाठी वापर करावा अशी सूचना केली.  हा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Web Title: Education through television and private channels; The Chief Minister's speech in the Goa Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.