काजूला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवण्यासाठी प्रयत्न; १५ ते १६ दरम्यान कांपाल येथे काजू महोत्सवाचे आयोजन
By समीर नाईक | Published: April 12, 2023 08:57 AM2023-04-12T08:57:30+5:302023-04-12T08:58:31+5:30
काजू लागवड ही राज्याची वेगळी खासियत आहे.
समीर नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: काजू लागवड ही राज्याची वेगळी खासियत आहे. काजू हे दुहेरी फळ आहे. काजूगर आणि बौद्धचाही व्यावसायिक वापर होतो. काजू लागवड आणि त्यापासून मिळणारे उत्पन्न याचे तंत्र गोमंतकीयांना अवगत झाले आहे. काजू बोंडपासून फेणी व अन्य उत्पादन घेतले जाते. फेणीमुळे गोव्याला प्रतिष्ठा लाभली आहे. फेणी हे राष्ट्रीय पेय व्हावे है वन विकास महामंडळाचे ध्येय आहे, असे वन विकास महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. दिव्या राणे यांनी लोकमतला सांगितले.
येत्या १५ ते १६ दरम्यान कांपाल येथे काजू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. काजू उत्पादक शेतकरी या उत्पादनाशी निगडित अन्य घटक, उद्योजक, स्वयंसाहाय्य गट यांना एकाच छताखाली आणून त्याना चांगले व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने हा महोत्सव भरवण्यात येत आहे. आतापर्यंत ५० हून अधिक स्टॉल्सची नोंदणी झाली आहे. अधिकाअधिक काजू उत्पादक व अन्य घटकांना यात सामावून घेण्याचा प्रयत्न राहील. त्यामुळे काजू उत्पादन वाढण्यास मदत होईल. अधिकाअधिक लोकांनी या महोत्सवाला आवर्जून भेट देऊन काजू उत्पादकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन राणे यांनी केले.
काजू महोत्सवामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे. पर्यटकांनी मोठ्या संख्येने या महोत्सवात सहभागी व्हावे यासाठी प्रयत्न सुख आहेत. हा महोत्सव राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी पर्यटन खात्याचाही हातभार लागणार आहे. हा महोत्सव यशस्वी झाला तर दरवर्षी हा महोत्सव भरवण्यात येईल. काजू
लागवड करणाऱ्या शेतकन्यांना चांगला फायदा करून देणे, हाच या मागचा मुख्य उद्देश आहे. असे डॉ. राणे यांनी सांगितले.
महोत्सवात काजू गॅलरी आणि प्रात्यक्षिकेही
काजू हे बहुउपयोगी फळ आहे. त्यासाठी अनेक उत्पादने घेता येतात. फक्त फेणीच नव्हे तर निरा, हुक आदी पेये तसेच काजूगरापासून विविध खाद्यपदार्थ बनवता येतात. या पदार्थाना बाजारात खूप मागणी आहे. याचा लाभ उत्पादकांना मिळावा, यासाठी हा महोत्सव यशस्वी ठरेल, असे राणे म्हणाल्या. या महोत्सवाच्या ठिकाणी काजू गॅलरी असणार असून विविध उत्पादने तसेच पदार्थ येथे मांडण्यात येणार आहेत. तसेच ही उत्पादने कशी तयार केली जातात याचे प्रात्यक्षिकही येथे होणार आहे, असे राणे यांनी सांगितले.
काजू उत्पादनात गोवा स्वयंपूर्ण होईल
या महोत्सवाला सरकारचे पूर्ण पाठबळ असून काजू उत्पादन वाढावे हे सरकारचे धोरण आहे. त्यामुळे सरकारने आता काजू बियांचे दर वाडवून १५० रुपये प्रति किलो केले आहेत. सरकारचे पाठबळ आणि उत्पादनाला योग्य मोबदला मिळाला तर राज्यात काजू लागवड क्षेत्र आणखी बहरेल. स्वयंपूर्ण गोवा आणि आत्मनिर्भर भारत या उपक्रमांतून सरकार काजूला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा प्रयत्न करत आहे. असेही डॉ. राणे यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"