जुवारी नदीवर आठ पदरी पूल
By admin | Published: August 26, 2015 01:28 AM2015-08-26T01:28:35+5:302015-08-26T01:28:48+5:30
पणजी : जुवारी नदीवर आठ पदरी केबलस्टेड पूल बांधला जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली असून येत्या दोन महिन्यांत
पणजी : जुवारी नदीवर आठ पदरी केबलस्टेड पूल बांधला जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली असून येत्या दोन महिन्यांत निविदा प्रक्रियेसह अन्य सोपस्कार पूर्ण केले जातील, अशी घोषणा बांधकाममंत्री सुदिन ढवळीक र यांनी मंगळवारी केली.
येथे पत्रकार परिषदेत बोलताना ढवळीकर यांनी सांगितले की, जुवारी नदीवरील समांतर केबलस्टेड पुलाचा पूर्ण प्रकल्प हा एकूण चार टप्प्यांचा आहे. पूल व पुलाला जोडणारे रस्ते मिळून एकूण १३.६३५ किलोमीटर लांबीचा सगळा प्रकल्प आहे. पहिल्या टप्प्यात बांबोळी ते आगशी असे ८.२३५ किमी लांबीचे रस्ता चौपदरीकरणाचे काम केले जाईल. त्यावर ८२९.६० कोटी रुपयांचा खर्च येईल.
दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष केबलस्टेड पूल बांधला जाईल. त्यावर ८८०.७५ कोटींचा खर्च केला जाईल. तिसऱ्या टप्प्यात कुठ्ठाळी ते वेर्णा असे ४.३१६ किलोमीटर रस्त्याचे काम केले जाईल. त्यावर ७८३.०५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
जुवारीवरील नव्या पुलाच्या कामाची पायाभरणी येत्या १९ डिसेंबर रोजी करावी, असे यापूर्वी ठरवले आहे. तथापि, केंद्रीय मंत्री गडकरी यांना वाटले, तर डिसेंबरपूर्वीच पायाभरणी होऊ शकते.
(खास प्रतिनिधी)