निवडणुकीचा गजर सुरू
By admin | Published: September 17, 2016 02:12 AM2016-09-17T02:12:31+5:302016-09-17T02:17:45+5:30
पणजी : विधानसभा निवडणुकीनिमित्ताने भारतीय भाषा सुरक्षा मंच व भाजप आमनेसामने उभे ठाकले आहेत. भाजपच्या बैठकांचे सत्र आजपासून सुरू होत आहे.
पणजी : विधानसभा निवडणुकीनिमित्ताने भारतीय भाषा सुरक्षा मंच व भाजप आमनेसामने उभे ठाकले आहेत. भाजपच्या बैठकांचे सत्र आजपासून सुरू होत आहे. पुढील काही महिने भाजप कार्यकर्त्यांना विविध उपक्रम देत निवडणुकीच्या कामात गुंतवून ठेवणार आहे. दुसऱ्या बाजूने भाषा सुरक्षा मंचने राजकीय पक्ष स्थापनेच्या निर्णयावर शुक्रवारी शिक्कामोर्तब केले व मातृभाषा रक्षणासाठी या निवडणुकीत भाजप हाच आपला प्रमुख शत्रू असल्याचे जाहीर केले आहे.
सत्ताधारी भाजपचा पराभव करण्याच्या हेतूने काय करता येईल, याविषयी भारतीय भाषा सुरक्षा मंचने विचार केला असून भाभासुमंच्या नव्या राजकीय पक्षाची ध्येयधोरणे व घटना याचा मसुदा मंजूर झाला आहे. भाजपविरुद्धची तपशीलवार रणनीती येत्या २ आॅक्टोबर रोजी जाहीर केली जाईल, असे भाषा सुरक्षा मंचने शुक्रवारी येथे जाहीर केले.
भाषा सुरक्षा मंचच्या केंद्रीय समितीची शुक्रवारी बांबोळी-कुजिरा येथे बैठक झाली. भाषा सुरक्षा मंचने राजकीय पक्ष स्थापन करण्यावर या बैठकीत शिक्कामोर्तब केले. तसेच पक्ष नोंदणीचे काम पुढे नेण्यास अॅड. हृदयनाथ शिरोडकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या समावेशाने स्थापलेल्या पथकाला सांगितले. म.गो. पक्षाला आम्ही दि. ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. इंग्रजी शाळांचे अनुदान बंद करावे म्हणून जी चळवळ सुरू आहे, ती यापुढे अधिक आक्रमक व व्यापक केली जाईल. म.गो. पक्षाने त्यासाठी भाजपशी युती तोडून भाषा सुरक्षा मंचसोबत यावे. शिवसेना व प्रजा पार्टीने आम्हाला पाठिंबा (पान ४ वर)