गोव्यातील ७४७४ दिव्यांगांना मतदानासाठी निवडणूक आयोगाने सर्व सुविधा केल्या सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 03:59 PM2019-04-20T15:59:54+5:302019-04-20T22:17:37+5:30
गोव्यातील लोकसभा निवडणूकीला फक्त तीन दिवस राहीलेले असून प्रत्येक नागरीकांने आपल्या मतदानाचा हक्क निभावावा यासाठी निवडणूक आयोग सर्व प्रकारची पावले उचलत आहेत.
वास्को - गोव्यातील लोकसभा निवडणूकीला फक्त तीन दिवस राहीलेले असून प्रत्येक नागरिकांने आपल्या मतदानाचा हक्क निभावावा यासाठी निवडणूक आयोग सर्व प्रकारची पावले उचलत आहेत. दक्षिण व उत्तर गोव्यात ७४७४ विविध प्रकारचे दिव्यांग मतदार असून, ह्या मतदारांना सुद्धा त्यांच्या हक्क कुठल्याच प्रकारची अडचण निर्माण न होता निभावायला मिळावी यासाठी निवडणूक आयोगाचे अधिकारी विविध प्रकारची पावले उचलत आहेत. दिव्यांग मतदाराला सर्व गरजू सुविधा उपलब्ध करण्यासाठी निवडणूक आयोगाने विविध प्रकारची पावले उचललेली असून यासाठी व्हील चेअर, मेगनीफायींग ग्लासीस अशा विविध गोष्टींची मतदान केंद्रावर सुविधा पुरविण्यात येणार अशी माहीती दक्षीण गोव्यातील जास्तित जास्त दिव्यांग मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी नियुक्त केलेला नोडल अधिकारी आग्नेलो फर्नांडीस यांनी दिली.
२३ एप्रिल ला दक्षीण व उत्तर गोव्यातील लोकसभा निवडणूक व तीन मतदारसंघात पोट निवडणूक होणार असून हे मतदान सुरळीत व शांतीने व्हावे यासाठी निवडणूक आयोगाचे अधिकारी सर्व प्रकारची पावले उचलत आहेत. निवडणूक चांगल्या प्रकारे होण्याबरोबरच जास्तित जास्त नागरीकांनी मतदानाचा हक्क निभावावा यासाठी सुद्धा निवडणूक आयोगाचे अधिकारी विविध प्रकारची पावले उचलत असून जागृति इत्यादी गोष्टी त्यांच्याकडून मागच्या काळात करण्यात आल्याचे दिसून आले आहे. गोव्यात असलेल्या विविध दिव्यांग मतदारांनी सुद्धा आपला हक्क बजावावा यासाठी निवडणूक आयोगाचे अधिकारी विविध प्रकारची पावले उचलत असून मतदान प्रक्रीयेच्या काळात त्यांना कुठलीच अडचण निर्माण न व्हावी याच्यावरही लक्ष देण्याचे काम चालू आहे. संपूर्ण गोव्यात ७ हजार ४७४ दिव्यांग मतदार असल्याची माहीती उपलब्ध झालेली असून यापैंकी ३२६३ दक्षिण तर ४२११ उत्तर गोव्यात दिव्यांग मतदार आहेत. दक्षीण गोव्यात कमी नजर अथवा नेत्रहीन असे २८८ तर उत्तर गोव्यात ३८५ मतदार आहेत. दक्षीण गोव्यात ३१४ तर उत्तर गोव्यात ३८५ मुखबधीर मतदार असल्याची माहीती उपलब्ध झाली आहे. याबरोबरच अन्य विविध दिव्यांग (पायात, हातात इत्यादी दिव्यांग) मतदारांची दक्षीण गोव्यात २६६१ अशी संख्या असून उत्त गोव्यात ही संख्या ३४७४ असल्याची माहीती विश्वसनीय सूत्रांनी दिली. प्रत्येक नागरीकाला मतदानाचा हक्क निभावण्यास मिळावा यासाठी निवडणूक आयोग सर्व प्रकारची पावले उचलत असून याकरीता विविध सुविधा पुरवण्यात येत असल्याचे नोडल अधिकारी आग्नेलो फर्नांडीस यांनी त्यांना संपर्क केला असता सांगितले. दक्षीण गोव्यातील विविध मतदार केंद्रावर दिव्यांग मतदारांना मतदानाच्या वेळी सुविधा मिळावी यासाठी ६६६ व्हील चेअर पुरवण्यात आलेली असल्याचे आग्नेलो फर्नांडीस यांनी सांगून यात मुरगाव तालुक्यात ११०, सालसेत २१८, केपे ८३, सांगे ३८, धारबांदोडा ४१, काणकोण ५३ व फोंडा १२३ व्हीलचेअर चा समावेश असल्याचे सांगितले.
तसेच गोव्यातील सर्व मतदार केंद्रावर ‘मेगनीफायींग ग्लासीस’ याबरोबरच दिव्यांगांना मतदानाच्या वेळी सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी अन्य विविध सुविधा उपलब्ध करण्यात येणार अशी माहिती त्यांनी दिली. ज्या दिव्यांग मतदाराला आपला हक्क बजावायचा आहे व त्याला मतदान केंद्रावर येण्यास अडचण निर्माण होते अशा मतदाराला केंद्रावर आणण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असे आग्नेलो फर्नांडीस यांनी माहीतीत पुढे सांगितले. २३ एप्रिल ला गोव्यात होणाऱ्या लोकसभा व पोटनिवडणुकीत जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांना कुठल्याच प्रकारची असुविधा निर्माण न होता त्यांना त्यांचा हक्क निभावण्यास मिळावा यासाठी निवडणूक आयोग सर्व उचित पावले उचलणार असे आग्नेलो फर्नांडीस यांनी माहितीत शेवटी सांगितले.