मंत्री, आमदारांचा निवडणूक खर्च ‘केवळ’ ५-१० लाख!
By admin | Published: April 14, 2017 02:39 AM2017-04-14T02:39:27+5:302017-04-14T02:46:33+5:30
पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीवेळी काही पराभूत व काही जिंकलेल्या उमेदवारांनी प्रचंड खर्च केला. मतदानाच्या आदल्या
पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीवेळी काही पराभूत व काही जिंकलेल्या उमेदवारांनी प्रचंड खर्च केला. मतदानाच्या आदल्या दोन-तीन दिवसांत तर राजकीय पक्षांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला; पण जे निवडून येऊन मंत्री व आमदार बनले आहेत, त्यांनी आपला निवडणूक खर्च हा पाच ते दहा लाख एवढाच दाखविला आहे.
अर्थात काहीजणांनी कमी खर्च केला; पण काही प्रस्थापितांनी प्रचंड खर्च केला. प्रचंड खर्च करणाऱ्यांपैकी काहीजण पराभूतही झाले. विधानसभा निवडणुकीवेळी खर्च करण्याची मर्यादा उमेदवारांसाठी प्रत्येकी २0 लाख आहे. निवडणुका फेब्रुवारी महिन्यात पार पडल्या, तरी उमेदवारांनी खर्चाचा तपशील निवडणूक आयोगाकडे सादर करण्यास दि. ११ एप्रिलपर्यंत मुदत होती. त्या मुदतीत बहुतेकांनी आपल्या खर्चाचा तपशील सादर केला आहे.
आयोगाकडे आलेल्या तपशिलानुसार साखळीचे आमदार डॉ. प्रमोद सावंत यांनी इतरांपेक्षा जास्त खर्च दाखवला आहे. त्यांनी १५ लाख खर्च केल्याचा हिशेब सादर
केला आहे. मुरगावचे पराभूत उमेदवार
व माजी वीजमंत्री मिलिंद नाईक यांनी
५ लाख १० हजारांचा खर्च दाखवला
आहे. मंत्री तथा प्रियोळचे आमदार गोविंद गावडे व सांगेचे आमदार प्रसाद गावकर
यांनी प्रत्येकी सुमारे साडेतीन लाखांचा
खर्च दाखवला आहे. (खास प्रतिनिधी)