बाणावली जिल्हा पंचायत तसेच विविध पंचायतींच्या १० प्रभागांसाठी २३ जून रोजी पोटनिवडणूक

By पूजा प्रभूगावकर | Published: May 31, 2024 05:13 PM2024-05-31T17:13:41+5:302024-05-31T17:17:47+5:30

मतमोजणी २४ जून रोजी होईल असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.

elections on june 23 for banavali district panchayat and 10 wards of various panchayat in goa | बाणावली जिल्हा पंचायत तसेच विविध पंचायतींच्या १० प्रभागांसाठी २३ जून रोजी पोटनिवडणूक

बाणावली जिल्हा पंचायत तसेच विविध पंचायतींच्या १० प्रभागांसाठी २३ जून रोजी पोटनिवडणूक

पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: दक्षिण गाेवा जिल्हा पंचायतीच्या बाणावली मतदारसंघ तसेच विविध पंचायतींच्या १० प्रभागांसाठी २३ जून रोजी पोट निवडणूक होईल. तर मतमोजणी २४ जून रोजी होईल असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.

दक्षिण गाेवा जिल्हा पंचायतीच्या बाणावली मतदारसंघासह फोंडा तालुक्यातील कुंडई पंचायतीचा प्रभाग ७, वळवई पंचायतीचा प्रभाग २, केरी पंचायतीचा प्रभाग ३ व बोरी पंचायतीचा प्रभाग ११. सासष्टी तालुक्यातील राशोल पंचायतीचा प्रभाग ५, सेर्रावली पंचायतीचा प्रभाग २,असोळणा पंचायतीचा प्रभाग १, डिचोली तालुक्यातील कुडणे पंचायतीचा प्रभाग २, केपे तालुक्यातील शेल्डे पंचायतीचा प्रभाग २ व बार्देश तालुक्यातील सुकुर पंचायतीचा प्रभाग १० यांच्या रिक्त पदांसाठी ही पोटनिवडणूक होईल.

या पोटनिवडणूकांसाठी ५ ते १२ जून दरम्यान सकाळी १० ते दुपारी १ या काळात उमेदवारी अर्ज स्विकारले जातील. गुरुवार १३ जून राेजी उमेदवारी अर्जांची छाननी, शुक्रवार १४ जून रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजे दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस, रविवार २३ जून रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजे दरम्यान मतदान व सोमवार २४ जून रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरु होईल.

Web Title: elections on june 23 for banavali district panchayat and 10 wards of various panchayat in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.