स्मार्ट पणजीसाठी इलैक्ट्रीक बससेवेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
By पूजा प्रभूगावकर | Published: July 1, 2024 12:54 PM2024-07-01T12:54:33+5:302024-07-01T12:55:11+5:30
स्मार्ट सिटी अंतर्गत पणजीत कदंब महामंडळा अंतर्गत इलैक्ट्रीक बसेसचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
पणजी: स्मार्ट सिटी अंतर्गत पणजीत इलैक्ट्रीक बसेस सुरु झाल्या तरी शहरात डिझेलवर धावणाऱ्या खासगी बसेस बंद होणार नाहीत. खासगी बसमालकांच्या व्यवसायावर गदा येणार नाही, त्यांनी चिंता करु नये असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
स्मार्ट सिटी अंतर्गत पणजीत कदंब महामंडळा अंतर्गत इलैक्ट्रीक बसेसचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. पहिल्या टप्प्यात सहा बसेस सुरु केल्या असून त्यानंतर १५ दिवसांनी या बसेसची संख्या वाढवली जाईल. राज्यातील सर्व सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात इलैक्ट्रीक वाहने सुरु करुन प्रदुषण कमी करण्यावर भर दिला जाईल असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, की सरकार प्रत्येक प्रत्येक क्षेत्रात सातत्याने नवनवीन गोष्टी करीत आहेत. पणजीत स्मार्ट सिटी अंतर्गत कदंब महामंडळाच्या इलैक्ट्रीक बसेस सुरु केल्या आहेत. शहरात एकूण ४८ इलैक्ट्रीक बसेस धावतील. या बसेस सुरु झाल्या म्हणून शहरात डिझेलवर धावणाऱ्या खासगी बसेस बंद होणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले.