व्यवसायिक ग्राहकांना वीज बिल वाढणार; सरकारची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 06:19 PM2019-11-15T18:19:42+5:302019-11-15T18:19:52+5:30
पणजी : राज्यातील व्यवसायिक ग्राहकांना वीज बिल वाढविले जाणार आहे. आठ ते दहा पैसे प्रती युनीट या पद्धतीने वीज ...
पणजी : राज्यातील व्यवसायिक ग्राहकांना वीज बिल वाढविले जाणार आहे. आठ ते दहा पैसे प्रती युनीट या पद्धतीने वीज बिल वाढविले जाईल, असे वीज मंत्री निलेश काब्राल यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले.
पत्रकारांशी बोलताना मंत्री काब्राल म्हणाले, की लवकरच सरकारचे वीज बिल धोरण येणार आहे. या धोरणानुसार घरगुती वापराच्या वीजेच्या दरात अगोदर वाढ केली जाणार नाही. जोर्पयत आम्ही चोवीस तास लोकांना अखंडीतपणो वीज पुरवठा करू शकत नाही, तोर्पयत आम्ही लोकांसाठी वीजेच्या दरात वाढ करणार नाही. मात्र व्यवसायिक वापराच्या वीजेवर 8 ते 1क् पैशांची वाढ होईल. एकदा आम्ही लोकांना चांगल्या प्रकारे अखंडीत वीज देऊ लागलो की, मग घरगुती वापराच्या वीज दरात वाढ करता येईल.
मंत्री काब्राल म्हणाले, की राज्यातील उद्योगांसाठी पोस्ट-पेड वीज बिल पद्धतही पुढील काळात लागू केली जाणार आहे. राज्यात एकूण सुमारे सात लाख साठ हजार वीज ग्राहक आहेत. त्यापैकी अडिच लाख ग्राहकांना डीजीटल वीज मिटर्स पुरविण्यात आले आहेत. यापुढे स्मार्ट मीटर्स उद्योगांना दिले जातील. त्यांच्यासाठी पोस्ट पेड बिल पद्धतही लागू केली जाईल.
मंत्री काब्राल यांनी सांगितले, की मंत्रिमंडळासमोर लवकरच सार्वजनिक वीज पुरवठा धोरण येणार आहे. यापुढे सरकारचे कोणतेच खाते त्या खात्यासाठीच्या वीज ट्रान्सफॉर्मरच्या मेन्टेनन्सचे काम करणार नाही. फक्त वीज खातेच काम करील. ट्रान्सफॉमर्रची देखभाल करण्याचे काम सरकारी खाती व्यवस्थित करत नाहीत. यामुळे वीज खात्याचा ट्रान्सफॉर्मर निकामी होतो असा अनुभव येतो. ओपा पाणी पुरवठा प्रकल्पाकडेची सार्वजनिक बांधकाम खात्याचा वीज विभाग ट्रान्सफॉर्मरची नीट काळजी घेत नाही. दोष मात्र वीज खात्यावर येतो.
दरम्यान, वेर्णा येथील औद्योगिक वसाहतीची वीज समस्या पूर्णपणो संपुष्टात येईल. त्या दिशेने काम जोरात सुरू आहे. जुने कंडक्टर्स बदलले जात आहेत. कांदोळीतही तसेच काम सुरू केले जाईल. काही ठिकाणी भूमीगत वीज वाहिन्या टाकण्याबाबतच्या निविदा जारी होऊ लागल्या आहेत. पुढील पावसाळ्य़ात गोमंतकीयांना वीजेपासून जास्त त्रस होणार नाही असा विश्वास काब्राल यांनी व्यक्त केला.