वीज बिलांचा शॉक!
By admin | Published: March 14, 2015 12:41 AM2015-03-14T00:41:51+5:302015-03-14T00:48:56+5:30
पणजी : राज्यातील वीज ग्राहकांना भरमसाट बिले येऊ लागल्यामुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. लहान-मोठ्या व्यवसायांनाही मोठा फटका बसला आहे.
पणजी : राज्यातील वीज ग्राहकांना भरमसाट बिले येऊ लागल्यामुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. लहान-मोठ्या व्यवसायांनाही मोठा फटका बसला आहे. यात भर म्हणून येत्या १ एप्रिलपासून वीज दरात प्रति युनिट २० पैशांची वाढ होणार असल्याने ग्राहकांचे कंबरडे मोडणार आहे.
वीज बिले वेळेत येत नाहीत. चार ते पाच महिन्यांनी एकदा वीज बिल येते. हे बिल एकदम काही हजार रुपयांचे आल्यानंतर ग्रामीण भागातील ग्राहकांचे अवसानच गळून पडते. उत्तर गोव्यातील अनेक ग्राहकांना सहा महिन्यांनी बिल आले आहे. ज्यांना पाचशे-सहाशे रुपयांचे बिल येत होते, त्यांना आता दहा-बारा हजारांचे बिल आले आहे. स्पॉट बिलिंग पद्धतीने यापूर्वी वीज खात्याने हात पोळून घेतले आहेत. या प्रयोगातून बंगळुरू येथील एका कंपनीला खात्याने फायदा करून दिला. स्पॉट बिलिंग पद्धतीमुळे दर महिन्यास ग्राहकांना बिले येतील, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात त्या योजनेचा फज्जा उडाला. एका बाजूने वेळेत बिले येत नाहीत म्हणून लोक हैराण आहेत, तर दुसऱ्या बाजूने काही हजार रुपये रकमेची बिले येऊ लागल्याने ती भरावी कशी, असा प्रश्न लोकांना
पडला आहे.
शेतकरी, बागायतदार अशा घटकांना मोटरपंप वापरावे लागतात. विजेवर चालणारे पंपसेट वापरल्याने बिल अलीकडे खूप मोठ्या प्रमाणात येते, असे शेतकऱ्यांनी सांगितले. लहान व्यावसायिकांना तर व्यवसायच नकोसे झाले आहेत. पणजीत अलीकडे वीजपुरवठाही वारंवार खंडित होऊ लागला आहे. (खास प्रतिनिधी)