गोव्यात वीज समस्येचा कहर, पर्रिकरांनी अमेरिकेहून साधला गोव्याच्या वीज मंत्र्याशी संपर्क
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2018 08:38 PM2018-06-04T20:38:01+5:302018-06-04T20:38:01+5:30
राज्यातील वीज यंत्रणा पूर्णपणो कोलमडल्यासारखी स्थिती रविवारी दिवसा व रात्रभर तिसवाडी तालुक्यात व राज्यातील अन्य भागांतही अनुभवास आल्यानंतर सरकारला शॉकच बसला आहे.
पणजी - राज्यातील वीज यंत्रणा पूर्णपणो कोलमडल्यासारखी स्थिती रविवारी दिवसा व रात्रभर तिसवाडी तालुक्यात व राज्यातील अन्य भागांतही अनुभवास आल्यानंतर सरकारला शॉकच बसला आहे. वीजेच्या समस्येबाबत अनेक आमदार, जिल्हा पंचायत सदस्य, सरपंच तसेच लोक प्रचंड नाराज झाले असून वीज यंत्रणोविषयी तक्रारी अमेरिकेर्पयत पोहचल्या आहेत. मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी सोमवारी सायंकाळी वीज मंत्री पांडुरंग मडकईकर यांच्याशी संपर्क साधला व निष्काळजी अभियंत्यांविरुद्ध प्रसंगी कारवाई करा, अशी सूचना केली. उच्चदाबाच्या वीज वाहिन्यांची नवी कनेक्शने देण्यावरही र्निबध लागू करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
राज्याच्या सर्वच भागांमध्ये सध्या वीजेच्या समस्येचाच विषय चर्चेत आहे. वादळवारा नसताना देखील ग्रामीण भागात पूर्ण दिवस वीज प्रवाह खंडीत राहण्याचे प्रकार घडतात. काही आमदारांसह विविध भागांतील सरपंच, नगरसेवक, नगराध्यक्ष वगैरे हैराण झाले आहेत. लोक आपआपल्या भागातील लोकप्रतिनिधींशी संपर्क साधतात व तक्रारी करतात.पण लोकांना आम्ही उत्तर काय म्हणून द्यावे असा प्रश्न अनेक आमदारांनाही पडला आहे. भाजपमधील अनेकांची सध्या गोची झालेली आहे. त्यांचेही कार्यकर्ते वीज समस्येबाबत तक्रारी करत आहेत. रविवारी ताळगाव, पणजी, सांतआंद्रे, कुंभारजुवे आदी मतदारसंघांतील बहुतेक भाग अंधारात राहिले. यामुळे सरकारमध्येही चिड वाढली. एका बिल्डरच्या सोयीसाठी उच्चदाबाची वाहिनी हलविण्याचा प्रयत्न झाला अशीही टीका होत आहे. सरकारने मात्र हा आरोप फेटाळला.
या सगळ्य़ा पाश्र्वभूमीवर अमेरिकेहून सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री र्पीकर यांचा मडकईकर यांना फोन आला. वीजप्रश्नी काय झाले आहे अशी विचारणा मुख्यमंत्र्यांनी केली तेव्हा मडकईकर यांनी अपु:या साधनसुविधांमुळे ज्या समस्या भेडसावत आहेत, त्याची माहिती दिली. यापुढे वीज क्षेत्रत आणखी कोणत्या सुविधा जर निर्माण करायच्या असतील तर त्याबाबतचे इस्टीमेट्स तयार करा, आपण निधीची तरतुद करू, असे मुख्यमंत्र्यांनी मडकईकर यांना सांगितले. सध्या 5क्क् कोटी रुपये कामाच्या निविदा जारी झाल्या आहेत. जे अभियंते किंवा अधिकारी निष्काळजीपणा किंवा कामचुकारपणा करतात त्यांच्याविरोधात कारवाई करा अशी सूचनाही आपल्याला मुख्यमंत्र्यांनी केल्याचे मंत्री मडकईकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
रेड्डी अकार्यक्षम?
वीज खात्याचे मुख्य अभियंते एन. रेड्डी यांच्यावर सध्या सगळीकडून टीकेचा रोख आहे. रेड्डी हे येत्या जुलैच्या अखेरीस निवृत्त होत आहेत. त्यांना कामामध्ये रस राहिलेली नाही अशी खात्यात चर्चा आहे. याविषयी लोकमतने मंत्री मडकईकर यांना विचारले असता, मडकईकर म्हणाले, की कदंब पठारावरील वीजवाहिनी हलविताना शट डाऊन घेतला गेला. वीजवाहिनी हलविण्याच्या कामात पावसामुळे व्यत्यय आला व काम लांबले. मात्र वीज खात्याने पर्यायी वीज वाहिनीची व्यवस्था करायला हवी होती. दीर्घकाळ लोकांना अंधारात ठेवायला नको होते हे मी मान्य करतो. वीज खाते त्याबाबत कमी पडले. मुख्य अभियंते रेड्डी यांच्याकडून मी अहवाल माहितला आहे.
मडकईकर म्हणतात
-बुधवारी वीज खात्यातील सर्व अभियंत्यांची बैठक घेईन
- यापुढे उच्च दाबाच्या वीज वाहिन्यांचे कनेक्शन देण्यावर निर्बंध
- कुठच्याच भागात यापुढे एक तासापेक्षा जास्तवेळ वीज शट डाऊन घेतला जाणार नाही. जर घ्यावा लागला तर पर्यायी व्यवस्था अगोदर केली जाईल
- बिल्डरच्या सोयीसाठी कदंब पठारावरील उच्च दाबाची वीजवाहिनी हलविली हा आरोप चुकीचा आहे. माङया मतदारसंघातील लोकांना अंधारात ठेवून मी बिल्डरची सोय करूच शकत नाही
- वीजवाहिनी हलविण्याचे काम पावसामुळे लांबले. यापुढे काळजी घेऊ. कामचुकार अधिका:यांवर प्रसंगी कारवाई.