वीज विभागातील कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू; पोलीस तपास सुरू

By पंकज शेट्ये | Published: November 18, 2023 08:23 PM2023-11-18T20:23:04+5:302023-11-18T20:24:06+5:30

वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक मेल्सन कुलासो यांनी दिलेल्या माहीतीनुसार शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास तो अपघात घडला.

Electricity department employee dies in accident; Police investigation started | वीज विभागातील कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू; पोलीस तपास सुरू

वीज विभागातील कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू; पोलीस तपास सुरू

वास्को: शनिवारी (दि.१८) दुपारी कुरपावाडा, कुठ्ठाळी रस्त्यावर दोन दुचाकीत झालेल्या अपघातात व्होळांत, वास्को येथे राहणाऱ्या ४१ वर्षीय योगानंद बांदोडकर याचा मृत्यू झाला. त्या अपघातात योगानंद याच्या दुचाकीवर मागे बसलेली त्याची नातेवाईक अस्मीता बांदोडकर आणि दुसऱ्या दुचाकीचा चालक जोयलन सोझा गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर इस्पितळात उपचार चालू आहे.

वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक मेल्सन कुलासो यांनी दिलेल्या माहीतीनुसार शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास तो अपघात घडला. व्होळांत भोवतेश्वर मंदिरासमोर राहणारा योगानंद दुपारी त्याची नातेवाईक अस्मीता हीला घेऊन कुरपावाडा, कुठ्ठाळीच्या मार्गाने दुचाकीवरून जात होता. त्याचवेळी जोयलन सोझा (रा: पंचवाडी, फोडा) नामक २० वर्षीय तरुण अन्य एका दुचाकीने चुकीच्या दिशेने येऊन त्यांने योगानंदच्या दुचाकीला समोरासमोरून जबर धडक दिली. त्या अपघातात योगानंद, त्याच्या दुचाकी मागे बसलेली त्याची नातेवाईक अस्मीता आणि अपघातात शामील असलेल्या दुसऱ्या दुचाकीचा चालक जोयलन गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना त्वरित बांबोळीच्या गोमॅकॉ इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले.

इस्पितळात नेल्यानंतर योगानंदचा मृत्यू झाल्याची माहीती वेर्णा पोलीस निरीक्षक मेल्सन कुलासो यांनी दिली. त्या अपघातात जखमी झालेल्या अस्मीता आणि जोयलन याच्यावर इस्पितळात उपचार चालू आहे. शनिवारी दुपारी कुरपावाडा, कुठ्ठाळी येथे अपघात होऊन मरण पावलेला योगानंद वीज विभागात कामाला होता. वेर्णा पोलीसांनी अपघाताचा पंचनामा केला असून पोलीस निरीक्षक मेल्सन कुलासो यांच्या मार्गदर्शनाखाली त्या अपघात प्रकरणाचा अधिक तपास चालू आहे

Web Title: Electricity department employee dies in accident; Police investigation started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.