गोव्यात छोट्या ग्राहकांसाठीची वीज दरवाढ येत्या महिन्यापासून मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2018 08:28 PM2018-04-21T20:28:40+5:302018-04-21T20:28:40+5:30
राज्यात झालेल्या वीज दरवाढीविरुद्ध अलिकडेच लोकांनी, आमदारांनी व सरकारमधील काही मंत्र्यांनीही टीकेचा सूर लावल्यानंतर जी वीज दरवाढ मागे घेण्याची घोषणा वीज मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी केली होती, ती दरवाढ अजून कायम आहे पण येत्या महिन्यापासून ही दरवाढ मागे घेतली जाणार आहे.
पणजी : राज्यात झालेल्या वीज दरवाढीविरुद्ध अलिकडेच लोकांनी, आमदारांनी व सरकारमधील काही मंत्र्यांनीही टीकेचा सूर लावल्यानंतर जी वीज दरवाढ मागे घेण्याची घोषणा वीज मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी केली होती, ती दरवाढ अजून कायम आहे पण येत्या महिन्यापासून ही दरवाढ मागे घेतली जाणार आहे. त्याविषयीची प्रक्रिया पूर्ण होत आली असून दर कपातीच्या निर्णयाची अंमलबजावणी येत्या महिन्यात होणार आहे.
एप्रिल महिन्यातही वीज ग्राहकांना वाढीव बिले आली. पूर्वी ज्यांना तीनशे- साडेतीनशे रुपयांचे बिल यायचे त्यांना पाचशे-सहाशे रुपयांचे बिल आले आहे. एफपीपीसीए शुल्क व अन्य विविध प्रकारचे शूल्क वीज बिलामध्ये आहेत. ग्राहकांमध्ये दरवाढीबाबत अजुनही नाराजी आहे. दोनशे युनीटपर्यंत जे वीज वापरतात, त्यांच्यासाठीची वीज दरवाढ मागे घेण्याची घोषणा सरकारने केल्यामुळे येत्या महिन्यापासून ही कपात लागू होईल. मंत्री विश्वजित राणे, काँग्रेसचे आमदार दिगंबर कामत आदींनी केल्या टीकेमुळे सरकारने दर कपातीचा निर्णय घेतला तरी, त्याची अंमलबजावणी मात्र अजून झालेली नाही. अर्थ खात्याकडून फाईल वीज मंत्र्यांर्पयत पोहचण्यासाठी विलंब लागला. कालच्या गुरुवारी फाईल मंत्री मडकईकर यांच्याकडे गेली व त्यांनी ती मंजुर केली आहे. जे लोक दोनशे युनीटपेक्षा जास्त वीज वापरतात, त्यांच्यासाठी प्रती युनीट क्.25 पैशांची वाढ आहे. सध्या दोनशे युनीटपेक्षा जास्त वीज वापरणा:यांसाठी युनीटमागे 2 रुपये 4क् पैसे असा दर आहे. हा दर 2 रुपये 65 पैसे होणार आहे.
संयुक्त वीज नियमन आयोगाने वीज दरात वाढ केली. सरकार वीज अनुदानावर वार्षिक जो पैसा खर्च करते, त्यात आणखी सात ते दहा कोटींची भर टाकली जाणार आहे. सरकार अनुदानावरील खर्च वाढवून छोटय़ा ग्राहकांना दिलासा देणार आहे. सरकारने 4.9 टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव आणला होता, त्यात आयोगाने वाढ करून वाढीचे प्रमाण 6.5 टक्क्यांर्पयत नेले. सरकारने 2क्क् वीज युनिटांर्पयत जे वीज वापरतात, त्यांना दिलासा दिला तरी, इतरांना मात्र दरवाढीची झळ बसेलच. दोनशे युनीटपेक्षा जास्त वीज वापरणारे ग्राहक संख्येने कमी नाहीत.