स्मार्ट सिटीच्या कामात सुरक्षितता वाढविणार; संचालक संजित रॉड्रिग्ज यांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 04:06 PM2024-01-04T16:06:39+5:302024-01-04T16:07:11+5:30
स्मार्ट सिटीच्या कामाबद्दल आणखी सुरक्षितता वाढविणार, संजित रॉड्रिग्ज यांचे विधान.
नारायण गावस, पणजी: स्मार्ट सिटीच्या कामाबद्दल आणखी सुरक्षितता वाढविणार आहे. ज्या ठिकाणी कामे सुरु आहे तेथे स्मार्ट सिटीचे अधिकाऱ्यांसोबत पाहणी करुन तेेथे सर्व ती सुरक्षितता पुरविली जाणार आहे, असे स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक संजित रॉड्रिग्ज यांनी सांगितले. दाेन दिवसांपूर्वी स्मार्ट सिटीच्या कामासाठी रस्त्यावर खोदण्यात आलेल्या खड्ड्यामध्ये पडून एका माजी नगरसेवकाच्या मुलाचा दुचाकीने पडून मृत्यू झाला होता. त्यांनतर सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
संजित रॉड्रिग्ज म्हणाले, राज्य मानव हक्क आयोगाने आम्हाला नोटीस बजावून स्मार्ट सिटीच्या कामाविषयी कारणे मागितली आहे. आम्ही या विषयी स्पष्टीकरण लवकरच आयाेगाला देणार आहोत. तसेच या कामाविषयी सुरक्षिततेच्या बाबतीत जे करता येईल तेवढे केले जाणार आहे. यामुळे अशा प्रकारच्या कुठल्याच घटना होणार नाही यासाठी काळजी घेतली जाणार आहे. तसेच स्मार्ट सिटीच्या कामाचा लोकांना त्रास हाेणार नाही याचीही दखल घेतली जाणार आहे.
स्मार्ट सिटीची कामे लवकर संपविण्याचे आव्हान आहे. त्यामुळे सर्व कामे केली जात आहे. पण या अगोदर ज्या चुका झाल्या आहेत त्या चुका पुन्हा होणार नाही, कामाचे याेग्य नियोजन करुन याची कामे केली जाणार आहे, स्मार्ट सिटीतर्फे सर्व जबाबदार खात्याचे अधिकाऱ्यांनी याची याेग्य दखल घेतली जाणार आहे. ज्या ठिकाणी खोदकाम आहे. तेथे दिशादर्शक असे फलक लावले जाणार आहेत. तसेच रात्रीच्या वेळी रस्त्यावर उजेड नाही तिथे दिवे लावले जात आहे, असे संजित राॅड्रिग्ज म्हणाले.