उद्योजक कृष्णा नायक यांचे निधन; मार्चमध्ये गाठले होते वयाचे शतक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 12:28 PM2023-09-29T12:28:21+5:302023-09-29T12:29:51+5:30
कृष्णा नायक यांना केवळ मडगावातच नव्हे तर संपूर्ण राज्यात आदराचे स्थान होते.
लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव: मडगावचे प्रसिद्ध उद्योजक व नानु एंटरप्रायजेसचे संस्थापक कृष्णा नानू नायक (१००) यांचे काल गुरूवारी मोंतहिल येथील कृष्णशिल या निवासस्थानी निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यातच त्यांचे निधन झाले.
कृष्णा नायक यांना केवळ मडगावातच नव्हे तर संपूर्ण राज्यात आदराचे स्थान होते. ते भाऊ या नावाने संपुर्ण गोव्यात सुपरिचित होते. केवळ व्यावसायिकच नव्हते तर निर्सगप्रेमीही होते. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (दि. २९) सकाळी ११ वा. मडगावाच्या हिंदू स्मशानभूमीत अंतिम संस्कार होणार आहेत.
२८ मार्च १९२३ मध्ये त्यांचा जन्मलेल्या नायक यांनी या वर्षी मार्च महिन्यात वयाची शंभरी साजरी केली होती. त्यांच्या पश्चात प्रवास, नारायण व संदेश हे मुलगे, मुलगी प्रभात भोबे, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पाश्चात मोठा परिवार आहे. सांतवनपर भेटीसाठी शनिवार, दि. ३० व रविवार दि. १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते दु.१२ व दु. ४ ते सांयकाळी ७ वा. पर्यंत मोन्त हिल येथील कृष्णशील या निवास्थानी
भेट देता येईल.
कृष्णा नायक यांचे व माझ्या कुटुंबियांचे पुर्वीपासून संबध होते. माझे वडील व ते मित्र होते. त्यांनी वयाची शंभरी पूर्ण केली. ते खरोखरच पुण्यवान होते. त्यांच्या निधनाने तीव्र दुख झाले आहे.
-दिगंबर कामत, आमदार-मडगाव.
आपले लाडके भाऊ यांना देवाज्ञा झाली आणि ते देवाघरी निघून गेले. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच अतिव दुःख झाले आहे. त्यांच्या पवित्र आत्मास शांती लाभो. - दामू नाईक, माजी आमदार फातोर्डा.