ईपीएफच्या लाचखोर सहआयुक्ताला सीबीआयकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 10:03 PM2018-12-31T22:03:32+5:302018-12-31T22:03:38+5:30

कामगार संबंधी नियमांचे उल्लंघनाबद्दल कारवाई टाळायची असेल तर लाच द्या अशी मागणी करणाऱ्या भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) खात्याच्या सहाय्यक भविष्य निधी आयुक्त रवींद्रनाथ रॉय याला सीबीआयने रंगेहाथ अटक केली.

The EPFO's bribery co-accused has been arrested by the CBI | ईपीएफच्या लाचखोर सहआयुक्ताला सीबीआयकडून अटक

ईपीएफच्या लाचखोर सहआयुक्ताला सीबीआयकडून अटक

googlenewsNext

पणजी: कामगार संबंधी नियमांचे उल्लंघनाबद्दल कारवाई टाळायची असेल तर लाच द्या अशी मागणी करणाऱ्या भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) खात्याच्या सहाय्यक भविष्य निधी आयुक्त रवींद्रनाथ रॉय याला सीबीआयने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई सीबीआयच्या गोवा विभागाकडून (भ्रष्टाचार विरोधी विभाग) सकाळी करण्यात आली. छापा सकाळी १०च्या सुमारास टाकण्यात आला होता आणि रात्री उशिरापर्यंत तो चालू ठेवण्यात आला होता. संशयित रवींद्रनाथ याच्या कार्यालयातील सर्व कागदपत्रांची छाननी चालू होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याच्या निवासस्थानीही छापा टाकण्याच्या हालचाली सुरू होत्या. या कारवाईदरम्यान सीबीआय अधिका-यांना काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे मिळाली असून त्यांनी ती जप्त केली आहेत.

समीर महाले या कंत्राटी कामगार पुरविणा-या व्यक्तीकडून रवींद्रनाथच्या विरोधात सीबीआयकडे तक्रार नोंदविली होती. महाले यांच्यावर भविष्य निर्वाह निधी आयुक्तालयाच्या कार्यालयातून कर्मचारी नियम उल्लंघनाचा ठपका ठेवण्यात आला होता. या प्रकरणात कारवाई व्हायला नको असेल तर लाच देऊन मोकळा हो, असे त्याने तक्रारदाराला सांगितले होते. ही लाच लाखात होती परंतु निश्चित रक्कम सीबीआयकडून जाहीर करण्यात आली नाही. महाले यांनी ही गोष्ट सीबीआयला कळविल्यानंमतर सीबीआयकडून व्यवस्थितपणे सापळा रचून कारवाई केली आणि रवींद्रनाथ याला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यास यश मिळविले.

या दरम्यान रवींद्रनाथ व तक्रारदार यांच्यातील संवादाचे रेकॉर्डिंगही सीबीआयकडून करण्यात आले आहे. तसेच पैसे घेतल्याचे पुरावे म्हणून त्याच्या ठशेही घेण्यात आले आहेत. शिवाय दोघांत झालेले फोनवरील संवादही रेकॉर्ड करण्यात आले आहेत. यामुळे संशयिताच्या अडणी वाढल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी याच खात्याच्या आणखी एका अधिका-याला लाचखोरी करताना सीबीआयने पकडले होते.

Web Title: The EPFO's bribery co-accused has been arrested by the CBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.