संघटित गुन्ह्यांवर कारवाईसाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करा, काँग्रेसची मागणी

By पूजा प्रभूगावकर | Published: June 19, 2024 01:34 PM2024-06-19T13:34:14+5:302024-06-19T15:01:43+5:30

कवठणकर म्हणाले, की मागील तीन वर्षात गोव्यात गुन्ह्यांच्या टक्केवारी वाढ झाली.

Establish a special task force to crack down on organized crime: Congress | संघटित गुन्ह्यांवर कारवाईसाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करा, काँग्रेसची मागणी

संघटित गुन्ह्यांवर कारवाईसाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करा, काँग्रेसची मागणी

पणजी: राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून असून वाढत्या संघटित गुन्ह्यांवर कारवाई करण्यासाठी सरकारने विशेष टास्क फोर्सची स्थापना करावी अशी मागणी प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

म्हापसा येथे झालेल्या मारहाणीत एका युवकाचा बळी गेला. हे दुर्देवी आहे. अशा घटना वारंवार घडत असून गुंड प्रवृती यास जबाबदार आहे. गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्र्यांनी राज्यात वाढत्या गुन्ह्यांची जबाबदारी घ्यावी. संघटीत गुन्ह्यांवर कारवाई करण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी त्यांनी केली.

कवठणकर म्हणाले, की मागील तीन वर्षात गोव्यात गुन्ह्यांच्या टक्केवारी वाढ झाली. काही पोलिस प्रामाणिकपणे काम करतात. मात्र त्यांच्यावर राजकारण्यांचा दबाव असतो. तर काही गुन्हेगारांना पोलिसांचाच आर्शिवाद लाभत आहे.म्हापसा येथे झालेल्या मारहाणीत एका युवकाचा बळी जाणे, मंडूर येथे नवजात अर्भकाचे अवयव मिळणे हे अत्यंत धक्कादायक आहे. महत्वाचे म्हणे या सर्वाकडे पोलिस तसेच सरकार गंभीर नाही असा आरोप त्यांनी केला.

Web Title: Establish a special task force to crack down on organized crime: Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा