भाजपच्या चौथ्या यादीतही दक्षीणेचा उमेदवार नाही
By वासुदेव.पागी | Published: March 22, 2024 04:29 PM2024-03-22T16:29:25+5:302024-03-22T16:31:12+5:30
भाजपकडून लोकसभेच्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत दक्षिण गोवा मतदारसंघात कोण उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या नावाची घोषणा असेल अशी अपेक्षा होती.
पणजीः दक्षिण गोव्यात भाजपचा उमेदवार कोण याचा निर्णय अजून भाजप लावू शकला नाही. भाजपच्या चौथ्या यादीतही दक्षिण गोवा मतदारसंघाचा उल्लेख झालेला नाही.
भाजपकडून लोकसभेच्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत दक्षिण गोवा मतदारसंघात कोण उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या नावाची घोषणा असेल अशी अपेक्षा होती. मात्र या यादीतही दक्षिणेचा उल्लेख झालेला नाहीत. त्यामुळे दक्षिणेत कोण हा प्रश्न अजून सुटलेला नाही हेच संकेत मिळत आहेत.
दक्षिण गोव्यातील भाजपचा पारंपरिक उमेदवार नरेंद्र सावईकर यांनाच उमेदवारी मिळार अशी सुरूवातीला अटकळ होती. परंतु सावईकर यांनाही नाही आणि इच्छुक उमेदवारांपैकी दामू नाईक आणि बाबू कवळेकर यांनाही नाही असे भाजप हायकमांडने गोवा राज्य भाजपला सांगितले आणि. यावेळी महिला उमेदवाराची चाचपणी करण्यास सांगितले होते. विद्या गावडे या केडरच्या महिला उमेदवारा व्यतिरिक्त इतर कँडरवाल्या कुणी पुढे आल्या नाहीत. परंतु गावडे यांच्या नावाचाही विचार झाला नाही. त्यानंतर पल्लवी धेंपे यांना उमेदवारी देण्या संबंधी चर्चा होती. शनिवारपर्यंत उमेदवार जाहीर होईल असे भाजपचे प्रदेश अध्यक्ष आणि खासदार सदानंद शेट तनावडे यांनी म्हटले आहे.