शॅक भाडेपट्टीवर देण्याचे प्रकारही यापुढे चालणार नाहीत; पर्यटनमंत्र्यांनी ठणकावले

By किशोर कुबल | Published: September 26, 2023 07:26 PM2023-09-26T19:26:00+5:302023-09-26T19:26:34+5:30

राजकारण करु देणार नाही.

even the form of shack leasing will no longer work said tourism minister | शॅक भाडेपट्टीवर देण्याचे प्रकारही यापुढे चालणार नाहीत; पर्यटनमंत्र्यांनी ठणकावले

शॅक भाडेपट्टीवर देण्याचे प्रकारही यापुढे चालणार नाहीत; पर्यटनमंत्र्यांनी ठणकावले

googlenewsNext

 

किशोर कुबल, पणजी : गोव्यात शॅकवाल्यांना ठणकावताना पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी कडक शब्दात इशारा दिला आहे. शॅकबाबत कोणालाही राजकारण करु देणार नाही. तसेच शॅक दुसय्रांना भाडेपट्टीवर देण्याचे प्रकारही खपवून घेणार नाही, असे त्यांनी बजावले आहे.

आज बुधवारी जागतिक पर्यटनदिन असून त्यानिमित्त कार्यक्रमाची तसेच पर्यटन खात्याच्या उपक्रमांची माहिती देण्यासाठी खंवटे यानी पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी पत्रकारांनी त्यांना किनाय्रावर पर्यटक हंगामात उभारण्यात येणाय्रा शॅकसंबंधी तसेच व्यावसायिकांनी शॅक धोरणास घेतलेल्या आक्षेपाबद्दल विचारले तेव्हा खंवटे म्हणाले कि,‘नवीन धोरण तयार करताना शॅकमालक तसेच संबंधित घटकांना विश्वासात घेतले होते. सरकारने प्रथमच सरकार आठ वेळा बैठका घेतल्या. मी स्वत: तीन तेचार बैठकांमध्ये सहभागी झालो. अधिकाय्रांनीही पाचवेळा बैठका घेऊन चर्चा केली. सर्वांची मतें आजमावूनच सर्वसमावेशक धोरण तयार केले.’

खंवटे म्हणाले कि, ‘ काहीजण राजकारण करत आहेत. स्थानिक आमदारांचाही यात सहभाग आहे. सरकारने शॅक वांटपाबाबत ८०:२० चा प्रस्ताव ठेवला होता. ८० टक्के शॅक आम्ही अनुभवींना देण्याचे निश्चित केले होते. परंतु शॅक व्यावसायिकांच्या मागणीवरुन प्रमाण वाढवून ९० केले. शॅक धोरणाबाबत आम्ही स्पष्ट आहोत. किनारी आमदार मायकल लोबो यांनीही पंचायती योग्य पध्दतीने शॅक बाबतीत नियोजन करु शकतात हे मान्य केले आहे.’

Web Title: even the form of shack leasing will no longer work said tourism minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.