गोव्यातही परीक्षा पुढे ढकलल्या, नाईट कर्फ्यू अन् कडक निर्बंध जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 07:09 PM2021-04-21T19:09:51+5:302021-04-21T19:10:41+5:30
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, की शालांत मंडळाच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. पंधरा दिवसांपूर्वी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या जातील.
पणजी : कोरोनाबळींची संख्या वाढत असल्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यात अखेर काही निर्बंध जाहीर केले. त्यात नाईट कर्फ्यूचाही समावेश आहे. रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत लोकांना सार्वजनिक ठिकाणी फिरता येणार नाही. पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्रही जमता येणार नाही. जीवनाश्यक वस्तूंची वाहतूक मात्र सुरू असेल. त्यांना परवानगीची गरज नसेल.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, की शालांत मंडळाच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. पंधरा दिवसांपूर्वी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या जातील. परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी गोव्यात झाली होती. कॅसिनो, बार, रेस्टॉरंस्ट, मसाज पार्लर, चित्रपटगृहे, जीम, बससेवा ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील.
स्विमिंग पूल, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, क्रीडा, सांस्कृतिक संस्थेचे कार्यक्रम, राजकीय सभा, बैठका ३० एप्रिलपर्यंत पूर्णपणे बंद असतील. लग्न समारंभासाठी केवळ ५० जणांनाच एकत्र येता येईल. अंत्यविधीसाठी २० जणांनाच परवानगी असेल. दरम्यान, गोव्यात कोरानामुळे मंगळवारी सर्वाधिक म्हणजे २६ बळी गेले होते. आता हजांराहून अधिक काेरोनाबाधित आढळून येत आहेत.