झारखंड निवडणुकीत गोव्याच्या पोलिसांची शानदार कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 13:47 IST2024-06-01T13:47:16+5:302024-06-01T13:47:48+5:30
पोलिस निरीक्षक सुधीर रेडकर यांच्या नेतृत्वाखाली गोवा पोलिस दलाचे एक पथक झारखंड येथे झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी गेले होते.

झारखंड निवडणुकीत गोव्याच्या पोलिसांची शानदार कामगिरी
पेडणे: पोलिस निरीक्षक सुधीर रेडकर यांच्या नेतृत्वाखाली गोवापोलिस दलाचे एक पथक झारखंड येथे झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी गेले होते. त्यांनी यशस्वीपणे तिथली प्रक्रिया पूर्ण केली. त्यांनी पार पाडलेल्या जबाबदारीचे कौतुक करण्यात आले.
पोलिस निरीक्षक सुधीर रेडकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक भैरो वरक, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चीनालकर, सहाय्यक सागर पार्सेकर, हेडकॉन्स्टेबल श्रीकृष्ण कामत, हेडकॉन्स्टेबल रत्नाकर सामंत, हेड कॉन्स्टेबल जितेंद्र परब, पीसी विवेक कान्नाईक, आत्माराम पालकर, मिरज रिडो आदींनी झारखंडमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी शानदार कामगिरी बजावली. तेथील मतदान प्रक्रिया सुरळीत चालू राहावी यासाठी त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने कामकाज केले.