बनावट दारुच्या विक्रीत अबकारी अधिकाऱ्याचा हात: आप नेते अमित पालेकरांचा आराेप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 06:23 PM2023-10-19T18:23:04+5:302023-10-19T18:23:36+5:30
खास राजकीय नेत्यांचा पाठिंबा मिळत असल्याचाही दावा
नारायण गावस, पणजी (गोवा): राज्यात अबकारी खात्याचा वरिष्ट अधिकाऱ्याच्या पाठीब्यामुळे आंतराज्य बेकायदा दारु विक्री सुरु आहे. याला खास राजकीय नेत्यांचा पाठींबा मिळत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे राज्य समन्वयक ॲड. अमित पालेकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. सरकारच्या अबकारी खात्यात माेठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु आहे. त्यामुळे मागिल काही दिवसापासून बाहेरील राज्यात गोव्याची बेकायदेशिर दारु पकडली जात आहे. कर्नाटकाच्या राज्यात सरकारने निर्बंध आणले तरी अवैध दारु विक्री सुरुच आहे, असे ॲड. अमित पालेकर यांनी म्हटले आहे.
राज्यात अशी बनावट दारुची विक्री केली जात तसेच परराज्यातही याची विक्री केली जात आहे. यात अबकारी खात्याचे वरिष्ट अधिकारी सहभागी असून सरकारकडून याची चाैकश करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा ाआरोपही अमित पालेकर यांनी केला आहे.
काणकोण, कुंडई, कुंकळी सांकवाळ या औद्याेगिक वसाहतीमध्ये मद्य निमिर्तीचे कारखाने आहे. त्या कारखान्यामध्ये स्पिरीट आयात केली जात आहे. या कारखान्यातून तयार होणारी दारुची विक्री बेकादेशीर परराज्यात केली जात आहे, असेही पाटकर म्हणाले.