तज्ज्ञ समिती सदस्यांनी राजीनामे देऊन घरी जावे; वेदांताच्या ईसीबाबत पर्यावरणप्रेमींची प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2024 09:04 AM2024-01-26T09:04:19+5:302024-01-26T09:04:25+5:30

१६७ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील खाण ब्लॉकसाठी पर्यावरणीय परवाना (ईसी) दिलेला आहे.

expert committee members should resign environmentalists react to vedanta ec | तज्ज्ञ समिती सदस्यांनी राजीनामे देऊन घरी जावे; वेदांताच्या ईसीबाबत पर्यावरणप्रेमींची प्रतिक्रिया

तज्ज्ञ समिती सदस्यांनी राजीनामे देऊन घरी जावे; वेदांताच्या ईसीबाबत पर्यावरणप्रेमींची प्रतिक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : बोर्डे-मुळगाव-शिरगाव खाण ब्लॉकसाठी वेदांता कंपनीला केंद्रीय पर्यावरण तथा वन मंत्रालयाने मंजूर केलेल्या ईसीवरुन खाणविरोधी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी संतप्त बनले आहेत. एक्सपर्ट अप्रायझल कमिटीवरील सदस्यांनी राजीनामे देऊन घरी जावे, अशी मागणी करण्यात येत असून प्रकरण न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

१६७ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील खाण ब्लॉकसाठी पर्यावरणीय परवाना (ईसी) दिलेला आहे, त्या क्षेत्रात २३० घरे, १४ मंदिरे, शाळा आणि नैसर्गिक जलस्रोत आहेत. परंतु पर्यावरण प्रभाव मूल्यांकन समितीच्या (ईआयए) न अहवालात याचा उल्लेखच नसल्याची -. माहिती पुढे आली आहे. या भागात खाण व्यवसाय सुरु झाल्यास जलस्रोतांवर मोठा परिणाम होऊन शेती, कुळागरेही नष्ट होतील, अशी भीती व्यक्त होत आहे. लोकांच्या भविष्याशी खेळून ईसी कशा दिल्या जातात? असा प्रश्न केला जात आहे.

या खाण ब्लॉकमध्ये येणारी तिन्ही गावे यापूर्वी खाणींचे खंदक कोसळून गावातील सुपीक शेतजमिनी आणि जलकुंभ नष्ट झालेले आहेत. पावसात खनिजमिश्रित पाणी शेतांमध्ये शिरुन शेती उद्ध्वस्त झालेली आहे. मुळगाव येथील श्री केळबाई देवस्थानचे भाविक नाराज आहेत. खाणकामामुळे संस्कृती, धर्म, जीवन, उपजीविका आणि गावाशी निगडित प्रत्येक गोष्टीला धोका निर्माण झाला आहे.

दरम्यान, क्लॉड शेवटी म्हणाले की, या ईसीला न्यायालयात आव्हान दिले जाईलच. आधी राष्ट्रीय हरित लवादाकडे व नंतर सर्वोच्च न्यायालयात अशा प्रकारे खटल्यास आणखी दहा ते पंधरा वर्षे जातील आणि याला जबाबदार केंद्रीय पर्यावरण तथा वन मंत्रायलच राहील.'

क्लॉड पुढे म्हणाले की; सेसाने गेल्या ५० वर्षांत काय केले याचा संबंध आमच्याशी नाही. आम्ही नव्याने ईसी मागितली आहे, असा जो बचाव वेदांताने घेतला आणि केंद्रीय पर्यावरण तथा वन मंत्रालय त्यास बळी पडले ही बाब अत्यंत संतापजनक आहे.

हे दिसले नाही का?

क्लॉड आल्वारिस म्हणाले की, या आधी सेसा कंपनीने पर्यावरणाची त्याच्याशी संबंध नाही, असे म्हणून वेदांताने केंद्रीय हात वर करणे व पर्यावरण मंत्रालयाने निमूटपणे करणे योग्य नव्हे. एक्सपर्ट अप्रायझल कमिटीवरील सदस्यांनी राजीनामे हवे. कंपनीने शंभर टक्के जी हानी केली आपला काहीच हे म्हणणे मान्य तज्ज्ञांच्या देऊन घरी जायला मालकी वेदांताकडे आहे हे जगाला ठाऊक आहे. त्यामुळे असे हात झटकता येणार नाहीत. तज्ज्ञ समितीने वेदांताला साधा प्रश्न विचारायला हवा होता की, या खाण ब्लॉकमध्ये अखेरचे उत्खनन झाले तेव्हा सेसाकडे ईसी होती का?'

'ईसी'ला कवडीमोल किंमत

क्लॉड पुढे म्हणाले की, केंद्रीय पर्यावरण तथा वन मंत्रालयाने दिलेल्या या ईसीला कवडीमोलाची किमत आहे. सेसाकडेही गेली दहा वर्षे ईसी होती. परंतु पर्यावरणाचे सर्व नियम धाब्यावर बसवत कंपनीने पिळगाव, लामगाव, मये गाव नष्ट केले. शिरगावमध्ये केवळ लोक राहतात ती घरेच शिल्लक राहिली आहेत. 'नीरी'च्या अहवालानुसार भूमिगत जलपातळीही बरीच खाली गेलेली आहे.

 

Web Title: expert committee members should resign environmentalists react to vedanta ec

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा