गोव्यात आजपासून अभिव्यक्ती परिषद
By admin | Published: November 18, 2016 07:22 AM2016-11-18T07:22:39+5:302016-11-18T07:22:39+5:30
राष्ट्रीय स्तरावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य संकोचाच्या पार्श्वभूमीवर मडगावात शुक्रवार दि. १८ पासून तीन दिवसांची अभिव्यक्ती दक्षिणायन
मडगाव : राष्ट्रीय स्तरावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य संकोचाच्या पार्श्वभूमीवर मडगावात शुक्रवार दि. १८ पासून तीन दिवसांची अभिव्यक्ती दक्षिणायन राष्ट्रीय परिषद सुरू होत आहे. या तीन दिवसांच्या परिषदेत प्रसारमाध्यमांवरील निर्बंध, गोमांस बंदीच्या फतव्याखाली अल्पसंख्याकांवर झालेले अत्याचार, दलितांवर होणारे हल्ले आणि साम्यवादी विचारवंतांच्या झालेल्या हत्यांवर चर्चा होणार आहे.
राष्ट्रीय व राज्यपातळीवरील सुमारे ९00 विचारवंत व कलाकार भाग घेणार आहेत.
या परिषदेला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला असून, परिषदेच्या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे म्हटले आहे. त्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.