बाबूशची काँग्रेसमधून ६ वर्षांसाठी हकालपट्टी
By admin | Published: March 12, 2015 01:51 AM2015-03-12T01:51:15+5:302015-03-12T01:54:55+5:30
पणजी : बाबूश मोन्सेरात यांना पक्षातून काढून टाकण्याच्या कार्यकारिणीचा निर्णय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंजूर केला
पणजी : बाबूश मोन्सेरात यांना पक्षातून काढून टाकण्याच्या कार्यकारिणीचा निर्णय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंजूर केला. बाबूशची काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. एखाद्या आमदाराला पक्षातून काढण्याची काँग्रेसमधील गोव्यातील ही पहिलीच घटना आहे.
२ फेब्रुवारी २०१५ रोजी प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीने बाबूश यांना पक्षातून काढून टाकण्याचा ठराव मंजूर करून तो मंजुरीसाठी पाठविला होता. एक महिन्याने म्हणजेच तीन मार्च रोजी सोनिया गांधी यांनी ठरावाला मंजुरी दिल्याची माहिती काँग्रेसचे सचिव सुनील कवठणकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
हकालपट्टी सहा वर्षांसाठी आहे, म्हणजेच पुनर्प्रवेश जवळ जवळ बंदच आहे. यापुढे शिस्तीच्या बाबतीत पक्ष कोणतीही तडजोड करणार नसल्याचे (पान २ वर)