दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांची उद्यापासून डोळे तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 06:31 PM2023-09-08T18:31:57+5:302023-09-08T18:35:34+5:30
विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या तपासणीसाठी शिक्षकांना प्रशिक्षण दिले होते. या शिक्षकांनी २७ हजार विद्यार्थ्यांना दृष्टी दोष असल्याचे सांगितले आहे
नारायण गावस -
पणजी: राज्यातील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी व्हिजन फोर ऑल कार्यक्रम सरकारने जानेवारी महिन्यात आयोजित केला होता. यात शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करण्याचे प्रशिक्षण दिले होते. यात शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करुन जवळपास २९ हजार ७२५ विद्यार्थ्यांना दृष्टीची समस्या जाणवली आहे. या विषयी आता उद्या ९ ते १३ सप्टेंबर पर्यंत प्रसाद नेत्रालय हॉस्पिटलच्या डोळ्यांच्या ताज्ज्ञांमार्फत तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती शिक्षण संचालक शैलेद्र झिंगडे यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या तपासणीसाठी शिक्षकांना प्रशिक्षण दिले होते. या शिक्षकांनी २७ हजार विद्यार्थ्यांना दृष्टी दोष असल्याचे सांगितले आहे. या विद्यार्थ्यंची आजपासून १३ सप्टेबरपर्यंत सकाळी ९ ते सायं. ५ पर्यंत तज्ञामार्फत तपासणी केली जाणार आहे. यात त्यांना सीएसआर मार्फत मोफत चष्मा दिला जाणार तसेच डोळ्याचा मोठा आजार असेल तर त्यांना प्रसाद नेत्रालयमध्ये भरती केली जाणार. पण यासाठी त्यांच्या पालकांची परवानगी घेतली जाणार आहे. सर्व मोफत केले जाणार आहे. विद्यार्थ्याच्या डोळ्यांच्या काळजीसाठी हा उपक्रम राबविले जात आहे, असे शैलेंद्र झिंगडे यांनी सांगितले.
आता चतुर्थी आहे तसेच पुढे ऑक्टोबर महिन्यामध्ये विद्यार्थ्यांच्या परिक्षा आहे. तसेच पुढे विविध कार्यक़्रम असल्याने आम्हाला आता लवकर या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करुन घ्यावी लागत आहे. पुढील पाच दिवसात या सर्व विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी केली जाणारा आहे. यात तज्ञामार्फत या विद्यार्थ्यांची ीतपासणी केली जाणार आहे. खरोखरच या विद्यार्थ्यांना दृष्टी दाेष असेल तर त्यांना पुढील उपचार केले जाणार आहे, असेही झिंगडे म्हणाले.