धनिकांचा गोव्यावर डोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2024 01:00 PM2024-07-28T13:00:13+5:302024-07-28T13:00:32+5:30
गोवा १९६१ साली मुक्त झाला ठेव्हा 'आमचें गोंय, आमकां जाय या चळवळीने आकार घेतला होता. कदाचित पुढील दहा वर्षांनंतर ही चळवळ अधिक आक्रमकपणे नव्याने जन्म घेऊ शकते असे वाटते.
सद्गुरू पाटील, संपादक, गोवा
धनिकांचे सेकंड होम कल्चर एक दिवस गोव्याला संपवून टाकेल. गोव्याचा निसर्ग व पर्यावरणच जर संपले तर पर्यटन व्यवसायही धोक्यात येईल. देशभरातील रियल इस्टेट व्यावसायिक गोव्याकडे सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहतात हे धोकादायक आहे. गोवा १९६१ साली मुक्त झाला तेव्हा 'आमचें गोंय, आमकां जाय' या चळवळीने आकार घेतला होता. कदाचित पुढील दहा वर्षानंतर ही चळवळ अधिक आक्रमकपणे नव्याने जन्म घेऊ शकते असे वाटते.
परवा विधानसभेत सातओहेचे आमदार वीरेश चोरकर पोटतिडकीने बोलले, शेत जमीन बुजवली जातेय. लैंड। फिलिंग कैसे जातेय वगैरे मुद्दे हे त्यांनी मांडले, अर्थात त्यांचा रोख हा सांताकृाचे आमदार रुदोल्फ कनौडिस यांच्यावर होता, रुदोल्फने स्पष्ट केले की आपण छैन अमिनीत भराव ठगैरे टाकलेला नाही, सोतआंद्रे अतदारसंघात येणारी ती जमीन आपली, पण तिथे आपण बांधलेली संरक्षक भिंत पावसात कोसळली, आपण लैंड फिलिंग वगैरे केलेले नाही, स्दोल्फचा दावा खराही असू शकतो किंवा खोटाही. विषय ती नाही. मुद्दा एका बांबोळीचा किंवा सांतआंद्रेचा नाही. गोव्यात अनेक ठिकाणी डॉगरफोड करणे किंवा शेत जमीन मुद्दाम बुजविण्याचे प्रकार बख्या परप्रांतीय बिल्डरांकडून सुरू आहेत. आपल्याला छान व्हा मिळावा म्हणून डोंगरांचर बिल्डर बांधकामे करत आहेत. अर्थात काहीवेळा कायद्याच्या चौकटीत राहून तर काहीवेळा कायदे हवे तसे वाकवून किंवा कायदेभंग करून है काम केले जात आहे. धनिकाचे सेकंड होम कल्चर एक दिवस गोव्याला संपवून टाकेल. गोव्याचा निसर्ग व पर्यावरणच अर संपले तर पर्यटन व्यवसायही धोक्यात येईल, सनबर्न, कसिनी जुगार, इडीएम यांच्यामुळे गोव्याची वेगळीच प्रतिमा देशातील हायप्रोफाइल लोकांच्या मनात ठसली आहे. एकार्थाने गोव्याचे झपाट्याने मुंबईत रुपांतर होताना दिसतेय.
फक्त सोळा लाख लोकसंख्येच्या गोव्यात आता वार्षिक एक कोटी पर्यटक येऊन जात आहेत, ताजी आकडेवारी गोवा विश्द्धनसभेत गेल्याच आठवक्रधात सादर झाली. ८० लाख देशी व २० लाख विदेशी पर्यटक येथे येतात. पर्यटकांचे स्वागतच आहे, पण देशभरातील रियल इस्टेट व्यावसायिक गोव्याकडे सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहतात है. धोकादायक आहे.
कायदेशीर पद्धतीने कुणीही धंदा करावाच मात्र गोव्याची पोर्तुगीजकालीन घरे कोट्यवधी रुपयांना विकत घेणे, गोव्याचे डोंगर फोडून तिथे फार्म हाउस किंवा हिला बांधणे, अमिनींचे भात प्रचंड वाढवून ठेवणे हे समाळे चक थांबले नाही तर गोवा वीस वर्षांनंतर अधिक संकटात असेल. महसूल मंत्री बाबूरा मोन्सेरात यांनी शुक्रवारी लेखी स्वरुपात एका प्राणादाखल विधानसभेत माहिती दिली आहे. गेल्या पाच वर्षांत १ हजार १७२ डॉगरफोड प्रकरणे गोव्यात नोंद झाली. एवढ्या प्रकरणांवर कारवाई झाली आहे. यापैकी बहुतांश प्रकरणे बादेश, तिसवाडी, पेडणे याच तालुक्यात घडल्याचे काढून येते.
समुद्रकिनारे असलेले भाग म्हणाने काणकोण से कोलवा तसेच बाईश से पेहणेपर्यंतची किनारपट्टी म्हणजे सोन्याचे अंडी देणारी कोंबड़ी असे धनिकांना वाटते गोव्यात सेटल होणे परप्रांतांमधील धनिकांना आवडते मनाला मोह पाडणारे रुपेरी वाळूचे समुद्रकिनारे, फेसाळत्या लाटा, किनाप्यावर केनाप्यावर मस्त डुलणारे माड, मासेमारीत व्यस्त असलेल्या होड्या, सुशेगाद (आरामदायी) जीवनशैली, पांढयाशुभ्र चर्वेस आणि सुबक कलाकृप्तीने नटलेली मंदिरे हे सगळे म्हणजे गोवा. साडेचारशे वर्षे पोर्तुगीजांची राजवट या प्रदेशात होती. साहजिकच लॅटिन संस्कृतीचा प्रभाव येथील वास्तुशास्त्रावर आहे. सासष्टी, मुरगाव, बार्दश व तिसवाही या चार तालुक्यांमध्ये पोर्तुगीजकालीन स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेली अनेक घरे दिसून येतात. ही घरे विकत घेण्यासाठी आता जगभरातील धनिकांमध्ये स्पर्धा लागली आहे. धनिकांचे गोव्यात होणारे अतिक्रमण मूळ गौयकारांना छळतेय. सेकंड होम कल्चर गेल्या पंधरा वर्षातच प्रचंड वेगाने वाढत चालले आहे. यामुळे आपली अस्मिता व संस्कृती धोक्यात येतेय ही गौयकारांची वेदना आता समजून घ्यावीच लागेल. याच वेदनेतून आता पर्यटकांचा आणि बड्या गुंतवणूकदारांचा, बिल्डरांचा उपद्रव स्थानिक लोकांना नकोसा वाटू लागला आहे.
बॉलिवूड, टॉलिवूडचे कलाकार, श्रीमंत क्रिकेटपटू, देशातील काही उद्योगपती यांनी गोव्यात डोंगरांवर फार्म हाउस बांधण्याचा सपाटा लागला आहे, कारही पंचायतीच्या ग्रामसभांमध्ये आ अधूनमधून असे विषय गाजतात. सासष्टीतील लोक याबाबत जास्त जागूत आहेत हे मान्य करावे लागेल, दिल्ली, मुंबई, पुणे, हत्याना, बंगळुरुमधील नमोठे बिल्डर्स गेल्या वीस वर्षांपासून गोव्यात जमिनी खरेदी करत आहेत. आता तर डॉगरही विकत घेतले जात आहेत, हे चिंताजनक आहे.
काही आरटीआय कार्यकर्त्यांनी अलिकडे याबाबत बिल्डरांविरुद्ध तक्रारी केल्या आहेत. अलिकडेच गोवा सरकारने एक कायदा केला. परप्रांतीयांना गोव्यात क्षेत जमिनी खरेदी करणे शक्य होऊ नये म्हणून कायदेशीर बंदी लागू केली गेली. पण त्यातूनही पळवाटा शोधल्या जातील धनिकांच्या मालमतांची म्यूटेशन्स एका दिवसात करून दिली जातात. केवळ राजकारण्यांना दोष देता येणार नाही, अनेक उपजिल्हाधिकारी व मामलेदार देखील तरबेज झाले आहेत. ते वाट्टेल तसे वागतात सामान्य लोकांना छळणारी पण धनिकांसाठी रेड कार्पेट अंधरणारी नोकरशाही गेल्या काही वर्षांत गोव्यात उदयास आली आहे.
पर्यटकांचा उपद्रव हा एक स्वतंत्र सर्वांचा विषय आहे. अजूनही पर्यटकांकडून दारू पिऊन बाटल्या वगैरे किनाऱ्यांवर टाकल्या जातात. त्यामुळे किनाऱ्यांना बकाल रूप प्राप्त होते. कलंगुट पंचायतीने मध्यंतरी एक निर्णय घेतला, पर्यटकांनी कळंगुटमध्ये खोली आरक्षित केली असल्याची पावती अगोदर दाखवावी किंवा कळंगुटमध्ये प्रवेश करण्यासाठी कर जमा करावा, असा हा निर्णय, अर्थात निर्णय वादाचा ठरला पण गोवा आता पर्यटकांचा उपद्रत खपवून घेण्याच्या स्थितीत नाही, अस्ता संदेश या निर्णयाने दिला आहे. डिसेंबरपासून रात्री उशिरापर्यंत पर्यटकांच्या किनाऱ्यांवर पाठां चालतात, सातत्याने त्याविरुद्ध आणि ध्वनी प्रदूषण व अन्य तक्रारी करून गोमंतकीय थकले आहेत, धनिकांचे सेकंड होम कल्चर आणि पर्यटकांचे गोव्यातील विविध उपद्रव गाला गोवा राज्य कंटाळलेय, हे अगाला नव्याने कळून येऊ लागले आहे.
समुद्राचे विहंगम दृश्य आपल्याला पाहता यावे म्हणून अनेक धनिकांनी गोव्यातील डोंगरांवर किंवा किनाऱ्यांवर बांधकामे केली आहेत. आपले सेकंड होम अशा ठिकाणीच बहुतेकांनी बांधले आहे. या विषयावरून स्थानिक विरुद्ध परप्रांतीय सेटलर्स यांच्यात संघर्ष होत आहे. न्यायालये, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ, हरित लवाद, सीआरझेड यंत्रणा यांच्याकडे मोठ्या संख्येने तकारी जात आहेत.
देशभरातील बड्या असामी किवा प्रचंड पैसेवाले सिनेस्टार व इतर जर गोव्यात सेकंद्र होम घेऊ लागले तर, आपल्याला भविष्यात गोव्यात फ्लॅट किंवा जमीन खरेदी करणे परवडणारच नाही अशी भीती गोमंतकीयांना वाटते. आताच मिरामार, दोनापावल अशा किनारी भागांत किंवा कळंगुट, कांदोळी, बागा अशा जगप्रसिद्ध किनारपट्टीत मूळ गोमंतकीयाला भूखंड खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या परवडतच नाही. गोव्याबाहेरील फिल्म स्टार्स किंवा राजकीय नेते मात्र या भागात मोठ्या प्रमाणात जमीन किंवा अन्य मालमत्ता खरेदी करत आहेत.
दोनशे वर्षे जुनी आकर्षक पोर्तुगीजकालीन घरे विकत घेण्याची टुम निघाली आहे. युरोपियन संस्कृतीचे आकर्षण असलेले देशभरातील धनिक ही घरे खरेदी करून त्यांचे नूतनीकरण करत आहेत. परप्रांतांमधून येणारे बड़े लोक जर गोव्यात स्थायिक होऊ लागले तर आपले अस्तित्व धोक्यात येईल, ही चिंता गोंयकारांना सतावत आहे.
गोवा १९६१ साली मुक्त झाला ठेव्हा 'आमचें गोंय, आमकां जाय या चळवळीने आकार घेतला होता. कदाचित पुढील दहा वर्षांनंतर ही चळवळ अधिक आक्रमकपणे नव्याने जन्म घेऊ शकते असे वाटते.