फसी गोवाचेही विमान अडकले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 09:27 PM2018-01-03T21:27:34+5:302018-01-03T21:59:39+5:30
येथील दाबोळी विमानतळावर मिग-२९ के या लढाऊ विमानाला झालेल्या अपघातामुळे धावपट्टी दोन तास बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे देशी विमानांचेही उड्डाण थांबवण्यात आले
वास्को : येथील दाबोळी विमानतळावर मिग-२९ के या लढाऊ विमानाला झालेल्या अपघातामुळे धावपट्टी दोन तास बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे देशी विमानांचेही उड्डाण थांबवण्यात आले. त्याचा फटका आयएसएल फुटबॉल स्पर्धेत खेळणाºया एफसी गोवा संघाला बसला. हा संघ कोलकाता येथे सामन्यासाठी बुधवारी रवाना झाला होता. मात्र, धावपट्टी दोन तास बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे एफसी गोव्याचा संघ उशिरा कोलकात्यात पोहचला. त्यामुळे सामना एक तास उशिरा म्हणजे ९ वाजता सुरू करावा लागला.
दिल्लीहून आलेले चार्टर्ड विमान संध्याकाळी ५.३० वा. उतरणार असे वाटते आणि तेथून आम्हाला दोन तासांचा वेळ लागेन त्यामुळे हा सामना वेळेवेर सुरू होईल, असे वाटत नाही. संध्याकाळी ८ वाजता सुरू होणारा हा सामना आता ९ वाजता सुरू होईल, असे आयएसएल अधिकाºयाने सांगितले.
कोलकात्याच्या विवेकानंद युवा भारती या स्टेडियमवर हा सामना खेळविण्यात येणार होता. वास्तविक एफसी गोवा संघ मंगळवारीच रवाना होणार होता़ परंतु मंगळवारीसुद्धा त्यांचे विमान रद्द झाले होते. त्यामुळे संघ बुधवारी जाण्याच्या तयारीत होता. सकाळी झालेल्या विमान दुर्घटनेमुळे विमानांची उड्ढाणे लांबणीवर पडली. त्यामुळे संघ कोलकात्यात उशिरा पोहचला. या संघाला सराव करण्यासाठीही वेळ मिळाला नाही.