भाजपच्या दक्षिण गोव्यातील उमेदवार पल्लवी धेंपे यांच्या नावे बोगस बातमी व्हायरल, तक्रार नोंद
By वासुदेव.पागी | Published: April 27, 2024 04:25 PM2024-04-27T16:25:37+5:302024-04-27T16:26:19+5:30
पल्लवी धेंपेंच्याविषयी गैरसमज पसरवणाऱ्या बातमीचे स्क्रीनशॉट व्हायरल केले जात असल्याची तक्रार रायबंदर पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागात दाखल केली आहे.
वासुदेव पागी, पणजी: भाजपच्या दक्षिण गोव्यातील उमेदवार पल्लवी धेंपे त्यांच्या नावे आक्षेपार्ह व खोटी बातमी व्हायरल करण्यात आल्याची तक्रार व्ही. एस. धेंपे होल्डिंग्स प्रा.च्या अधिकृत प्रतिनिधी शर्मिला एस. प्रभू यांच्याकडून गोवा सायबर पोलिस स्थानकात नोंदविण्यात आली आहे. धेंपे यांच्या विरुद्ध गैरसमज पसरविणारा हा प्रकार असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. भाजच्या उमेदवार उद्योजक श्रीनिवास धेंपे यांच्या पत्नी यांचा उल्लेख असलेला आणि त्यांच्याविषयी चुकीची बातमी पसरविणारी एक बातमी सोशल मिडियावर व्हायरल करण्यात आली आहे. या बातमीचे स्क्रीनशॉट अधिक व्हायरल झाले आहे.
निवडणुकीनंतर धेंपे आणि अदानी समुह एकत्र होण्याची अपेक्षा’ अशा अर्थाची ही बातमी आहे. या बातमीचा स्क्रीनशॉट तक्रारदाराने सायबर पोलिसांना सादरकेला आहे. ही बोगस आणि गैसमज पसरविणारी बातमी कुणी प्रसिदध केली आणि कुण ती व्हायरल केली याचा तपास करण्याची मागणीही तक्रारदाराने केली आहे.
पल्लवी धेंपे दक्षिण गोव्यातून भाजपच्या तिकीटावर रिंगणात उतरल्या आहेत. आता त्यांच्याविषयी गैरसमज पसरवणाऱ्या बातमीचे स्क्रिनशॉट व्हॉट्सएपवरून व्हायरल केले जात असल्याचे आढळून आले आहे. तशी तक्रार यांनी रायबंदर येथील पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागात दाखल केली आहे. या बातमीला पल्लवी धेंपे यांचे छायाचित्रही जोडण्यात आली हे. त्यामुळे लोकांचा गैरसमज होऊ नये म्हणूनही ही तक्रार नोंदविण्यात आली हे अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
‘व्हॉट्सअप'वरून प्रसारित केली जात आहे. त्या बातमीसोबत भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांचे छायाचित्रही जोडण्यात आले आहे. वास्तवात पल्लवी या कंपनीच्या धेंपे समुहातील संचालकांपैकी एक आहेत. त्यामुळे ही बातमी अत्यंत खोटी आहे. बातमीत दिल्याप्रमाणे, तसा कोणत्याही कराराचा प्रस्ताव कंपनीने अदानी समुहाला दिलेला नाही. धेंम्पो आणि आदानी कंपन्यांत कोणताही समझोता झालेला नाही. तसेच संलग्न होण्यासंबधी अजून कोणता प्रस्तावही नाही असेही या तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे.