स्वपक्षीय आमदारांना फालेरोंचे टोमणे
By admin | Published: January 8, 2017 01:36 AM2017-01-08T01:36:02+5:302017-01-08T01:37:30+5:30
पणजी : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वपक्षीय आमदारांनाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी शनिवारी जोरदार
पणजी : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वपक्षीय आमदारांनाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी शनिवारी जोरदार टोमणे मारले. गेली पाच वर्षे आमच्या पक्षाचे काही नेते पणजीतील काँग्रेस हाउसमध्ये आले नाहीत; पण दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात मात्र
सध्या ते धाव घेत आहेत, असे शेरे
फालेरो यांनी मनमुरादपणे हसत हसत पत्रकार परिषदेवेळी मारले.
फालेरो म्हणाले की, पक्षबांधणीवर मी सगळा भर दिला. गेली पाच वर्षे आमच्या पक्षाच्या आमदारांना काँग्रेसच्या पणजीतील कार्यालयात येण्यास वेळ मिळाला नाही; पण त्यांना आपण दिल्लीत धाव घेण्यास भाग पाडले. आता अनेकजण दिल्ली वाऱ्या करत आहेत.
फालेरो यांनी कुणाचे नाव घेतले नाही; पण काँग्रेसच्या कोणत्या आमदारांना ते टोमणे मारत आहेत हे सर्वांच्याच लक्षात आले. काँग्रेसचे काही आमदार सध्या
युती हवी म्हणून धडपडत असून ते संघटितपणे दिल्लीला जाऊन दिग्विजय सिंग यांना भेटून आले. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी फालेरो यांना, युतीशिवाय सत्तेवर येऊ असा काँग्रेसला विश्वास आहे
काय, असे विचारले असता, आपण त्याविषयीचे उत्तर येत्या १० तारखेनंतर देईन, असे फालेरो यांनी सांगितले. १० रोजी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची व ९ रोजी छाननी समितीची बैठक होत आहे. आम्ही आजपर्यंत चाळीसही मतदारसंघांत स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे, असे फालेरो म्हणाले. (खास प्रतिनिधी)