खोटी तक्रार विवाहबाह्य संबंध लपविण्यासाठीच!

By admin | Published: July 14, 2017 02:25 AM2017-07-14T02:25:51+5:302017-07-14T02:26:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी/डोंगरी : स्वत:चे विवाहबाह्य संबंध लपविण्यासाठीच श्वेता होबळे यांनी आपल्याविरोधात हुंड्यासाठी छळ चालविल्याची खोटी तक्रार

False complaint to hide the relationship! | खोटी तक्रार विवाहबाह्य संबंध लपविण्यासाठीच!

खोटी तक्रार विवाहबाह्य संबंध लपविण्यासाठीच!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी/डोंगरी : स्वत:चे विवाहबाह्य संबंध लपविण्यासाठीच श्वेता होबळे यांनी आपल्याविरोधात हुंड्यासाठी छळ चालविल्याची खोटी तक्रार नोंदविल्याचा दावा होबळे कुटुंबीयांनी केला आहे. या दाव्याच्या पुष्ट्यर्थ काही पुरावेही आपण पोलिसांना दिले आहेत, अशी माहिती त्यांनी आज पत्रकार परिषदेतून दिली. या वेळी अनिल होबळे यांच्यासमवेत पुत्र मिलिंद आणि पत्नी संध्या यांची उपस्थिती होती.
नव्याने समोर आलेल्या माहितीमुळे या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. श्वेता हिचे एका स्थानिक युवकाशी गेल्या दीड वर्षापासून असलेले संबंधही उघड झाले असून श्वेताने आणि त्या युवकानेही या संबंधांची कबुली दिल्याचा दावा होबळे कुटुंबीयांनी केला. १० जुलै रोजीच्या मध्यरात्रीच या प्रकाराची माहिती मिलिंदला मिळाली. श्वेताच्याच मोबाईलवरील व्हॉट्सअ‍ॅप चॅट वाचून त्यांना हा प्रकार समजला, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. श्वेताचे आपल्या मित्रासोबतचे ९० पाने भरतील एवढे अत्यंत आक्षेपार्ह असे संभाषण व दोघांनी एकामेकांना पाठवलेले फोटो आणि चित्रफिती पाहून मिलिंदने आई-वडिलांना कल्पना दिली.
श्वेता आणि मिलिंद याना एक सहा
वर्षांचा मुलगा आणि अडीच वर्षांची मुलगी आहे. केवळ नातवंडांच्या भवितव्यासाठी श्वेताला अजूनही घरात ठेवायला तयार असल्याचे होबळे कुटुंबीय सांगतात.

Web Title: False complaint to hide the relationship!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.