शेतकऱ्यांनो, केवायसी करा; अन्यथा सहा हजार विसरा...!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 09:29 AM2023-09-16T09:29:23+5:302023-09-16T09:30:44+5:30
'पीएम किसान सन्मान'ला पात्र होण्यासाठी अनिवार्य.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना ई- केवायसी आणि आधार लिंक पीएम किसान करणे अनिवार्य सम्मान निधि आहे.
वारंवार सांगूनही राज्यातील काही शेतकऱ्यांनी ते केलेले नाही. त्यामुळे अनेकांची नावे या योजनेतून कृषी खात्याने रद्द केली आहेत. अजूनही काही शेतकऱ्यांनी ई- केवायसी केलेले नाही. त्यांनी करून घ्यावी, असे आवाहन कृषी खात्याने केले आहे.
आधार लिंक करा
राज्यात अगोदर जवळपास ८ हजार शेतकरी पीएम किसान सन्मान निधीचे लाभार्थी होते. पण, जेव्हा केंद्र सरकारने ई-केवायसी तसेच आधार लिंक करणे अनिवार्य केले, त्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी हे केलेले नाही. ज्या शेतकऱ्यांनी अजूनही लिंकिंग केले नाही त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावे, असे आवाहन कृषी खात्याने केले आहे.
४ जणांची नावे रद्द
या अगोदर घेत असलेल्या एकूण ८ हजार लाभार्थ्यांपैकी ४ हजार लाभार्थ्यांची नावे या यादीतून रद्द केली आहेत. अनेक वेळा सांगूनही या शेतकयांनी ई-केवायसी तसेच आधार लिंकिंग केले नाही. त्यांच्याकडे योग्य कागदपत्रे नसल्याचे आढळून आ आहे. तसेच, काही जणांच्या नावावर जमिनी नाही तर काही हे सरकारी पेन्शन घेऊनही या योजनेचा लाभ घेत होते. असे अनेक प्रकार आढळून आले त्यामुळे अनेकांची नावे या यादीतून रद्द झाली आहे, अशी कृषी खात्याकडून माहिती मिळाली आहे.
४ हजार शेतकऱ्यांकडून लिंक
गेली वर्षभर यासाठी कृषी खात्याकडून आवाहन केले जात होते. त्यामुळे जवळपास ४.५ हजार शेतकऱ्यांनी ई-केवायसी तसेच आधार लिंकिंग केले आहे. या सर्व शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. म्हणजे प्रति महिना ५०० रुपये निधी दिला जातो. शेतकऱ्यांना बँक खात्यात चार महिन्यांनी एकदा दोन हजार रुपये जमा केले जात आहे. या पैशांचा गरीब शेतकऱ्यांना काही प्रमाणात आधार मिळत असतो.
गोव्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी ई- केवायसी तसेच आधार लिंकिंग केलेले आहे. तर, अनेक शेतकऱ्यांनी ते केलेले नाही, त्यांना अन्य विविध अडचणी आहेत. तर, काही जण हे सरकारी पेन्शनधारक होते, त्यांची नावे यादीतून काढण्यात आली आहेत. - नेविल अल्फान्सो, कृषी संचालक