पिता-पुत्राने पणजी घातली खड्डयात: उत्पल पर्रीकर; 'स्मार्ट सिटी'च्या कामावरून घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 09:00 AM2023-04-03T09:00:16+5:302023-04-03T09:01:21+5:30
पणजीत चाललेल्या अनियोजित खोदकामांच्या बाबतीत विचारले असता 'लोकमत'शी बोलताना उत्पल यांनी आपला अंदाज खरा ठरल्याचे सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजीः पणजीकरांसह इतर लोकमत न्यूज नेटवर्क ठिकाणाहून पणजीत येणाऱ्यांना भयंकर त्रास सहन करावा लागतो आहे. याला जबाबदार पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात आणि आमदार बाबूश मोन्सेरात असल्याचा आरोप करत, पिता-पुत्रांनी मिळून पणजी खड्ड्यात घातल्याची घणाघाती टीका उत्पल पर्रीकर यांनी केली आहे.
पणजीत चाललेल्या अनियोजित खोदकामांच्या बाबतीत विचारले असता 'लोकमत'शी बोलताना उत्पल यांनी आपला अंदाज खरा ठरल्याचे सांगितले. विधानसभा निवडणुकीवेळी मी सांगत होतो की वडील आणि मुलगा मिळून पणजीला खड्डयात घालतील. आता नेमकी तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मार्च अखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण होतील, असे सांगणारे महापौर आता काय बोलणार? पावसाळ्यापूर्वी हे सर्व सुरळीत होईल असे दिसत नाही, असेही उत्पल म्हणाले. मंत्री आणि पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात व महापौर रोहित मोन्सेरात या दोघांनाही पणजीतील खड्यांबाबत विचारले असता, ते आपले हात वर करीत आहेत, असे ते म्हणाले. जबाबदारी स्वीकारायची नाही, केवळ केवळ लोकप्रतिनिधी म्हणून मिरवायचे आणि पदे भोगायची ही मानसिकता असल्याची टीकाही पर्रीकर यांनी यावेळी केली.
लोक न्यायालयात जातील
'स्मार्ट सिटी' अंतर्गत जी कामे सुरू आहेत, ती ती पणजी महापालिकेच्या अखत्यारीत होत आहेत. त्यामुळे लोकांना होत असलेल्या त्रासासाठी महापालिका जबाबदार आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी कामांबाबतीत लोक न्यायालयातही जाऊ शकतात, असे ते म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"