वडिलांनीच दाखवला ड्रग्सचा मार्ग, एनसीकडून युवकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2017 07:58 PM2017-10-31T19:58:55+5:302017-10-31T19:59:31+5:30
वडिलांचा अदर्श डोळ्यांसमोर ठेऊन चालणारी खूप मुले आहेत. परंतु वडिलच खोटा शिक्का ठरला तरी? नेमका तसाच प्रकार असगाव येथील कुटुंबावर अला अाहे.
पणजी - वडिलांचा अदर्श डोळ्यांसमोर ठेऊन चालणारी खूप मुले आहेत. परंतु वडिलच खोटा शिक्का ठरला तरी? नेमका तसाच प्रकार असगाव येथील कुटुंबावर अला अाहे. वडिलांचा अदर्श समोर ठेऊन जाणाºया एक नव्हे तर दोन्ही मुलांना वडिला प्रमाणेच ड्रग्स प्रकरणात तुरुंगात जावे लागले.
मर्विन फर्नाडीस या २४ वर्षीय युवकाला अंमली पदार्थ विरोधी विभागाकडून ड्रग्स विक्री प्रकरणात अटक करण्यात आली.
पणजी येथील कदंब बस्टँडच्या मागे ड्रग्स विक्री करताना अंमली पदार्थ विरोधी विभागाने त्याला अटक केली. मर्विनजवळ ७५ हजार रुपये किंमतीचा १५ ग्रँम एमडीएमए ड्रग्स सापडला. अंमली पदार्थ विरोधी विभागाचे उपनिरीक्षक मंजुनाथ नाईक व सहकाºयांनी ही नियोजनबद्द कारवाई करताना संशयिताला रंगहाथ पकडण्यात यश मिळविले.
पोलीसांनी त्याची चौकश्ी केली असता हा गुन्हेगारी वारसा त्याला त्याच्या वडिलाकडून मिळाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याचे वडील कायतान फर्नांडीसही ड्रग्सच्या व्यवहारात होते आणि त्यासाठी त्याला मुद्देमालासह अटक करून खटलाही चालविला होता आणि त्यात तो दोषी ठरला होता. मर्विनला एक थोरला बंधुही आहे, आणि तोही याच धंद्यात आहे. ड्रग्स प्रकरणात पकडला गेला होता. मगळवारी मर्विनला पकडण्यात अल्यावर मर्विनची आली एएनसीच्या कार्यालयाबाहेर धावपळ करताना दिसली.