विविध आजारांना वैतागून वृद्धेने उचललं टोकाचं पाऊल, विष पिऊन संपवलं जीवन
By सूरज.नाईकपवार | Updated: June 9, 2024 13:14 IST2024-06-09T13:12:37+5:302024-06-09T13:14:09+5:30
मारिया रिटा फर्नांडिस (८०) असे मयताचे नाव असून, त्या भाकभाट राय येथील रहिवाशी आहेत

विविध आजारांना वैतागून वृद्धेने उचललं टोकाचं पाऊल, विष पिऊन संपवलं जीवन
सूरज नाईकपवार, लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव: वृध्दापकाळात विविध आजार जडल्याने कंटाळून एका वृध्देने उंदीर मारण्याचे विष पिउन आपले स्वताचे जीवन संपविण्याची दुदैवी घटना दक्षिण गोव्यातील सासष्टीच्या मायणा कुडतरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. मारिया रिटा फर्नांडिस (८०) असे मयताचे नाव असून, ती भाकभाट राय येथील रहिवाशी आहे.
वृध्दापवस्थेमुळे तिला अनेक व्याधी जडल्या होत्या. त्यातून वैतागून तीने वरील टोकाचे पाउल उचलले व आपले जीवन संपविले असे पोलिसांना तपासात आढळून आले आहे. तिला उलटया होत असल्याने घरच्या मंंडळीने तिला त्याबाबत विचारले असता, आपण उंदीर मारण्याचे विष घेतल्याचे तिने सांगितले. घडलेला प्रकार लक्षात येतात, कुटुंबियांनी लागलीच तिला उपचारासाठी येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल केले. शुक्रवार दि. ७ जून रोजी वरील घटना घडली. इस्पितळात उपचार सुरु असताना दुसऱ्या दिवशी शनिवारी दि. ८ रोजी तिला मृत्यू आला. अनैसर्गिक मृत्यू म्हणून मायणा कुडतरी पोलिसांनी वरील प्रकरण नोंदवून घेतले आहे. पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रशांत भगत पुढील तपास करीत आहेत.