राज्यात फिल्म सिटी उभारणार: मुख्यमंत्री सावंत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 11:07 AM2023-08-14T11:07:14+5:302023-08-14T11:08:51+5:30
गोमंतकीय लोक सुशेगाद होत आहेत. बाहेरील लोक अनेक संधींचा लाभ घेतात.
लोकमत न्यूज नेटवर्क डिचोली : 'राज्यात चित्रपट निर्मितीचे प्रशिक्षण घेतल्यास अनेक संधी उपलब्ध होतील. राज्यात सध्या फिल्म सिटी उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. येथे मिनी सिटी उभारण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी केली.
साखळी येथे फिल्म मेकिंग कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. नोव्हेंबरमध्ये दक्षिण गोव्यात भव्य बाल चित्रपट महोत्सव आयोजीत केला जाईल असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले की, "चित्रपट क्षेत्रातील आधुनिक प्रशिक्षण घेतल्यास अनेक संधी आहेत. त्याचा सर्वांनी लाभ घेणे गरजेचे आहे. तरुणांनी सरकारी नोकरीसाठीच हट्ट धरू नये. विविध संधींचा लाभ घ्या. गोमंतकीय लोक 'सुशेगाद' होत आहेत. बाहेरील लोक अनेक प्रकारच्या संधींचा लाभ घेतात. त्याचबरोबर गोमंतकीयांना लुबाडण्याचा प्रकारही अनेक वेळा घडले आहेत. त्यामुळे गोव्यातील लोकांनी जागरुक राहून उपलब्ध संधीचे सोने करावे.'
आमदार प्रेमेंद्र शेट यांनी राज्यात फिल्म सिटीसाठी पोषक वातावरवण असल्याने या ठिकाणी युवकांनी संधी घ्यावी' असे आवाहन त्यांनी केले. रश्मी देसाई यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. राज्यातील सर्व तालुक्यात अशा स्वरूपाची कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा सावंत यांनी केली. नगराध्यक्षा रश्मी देसाई, माहिती खात्याचे सचिव दीपक बांदेकर, कुंदन फळारी, गोपाळ सुर्लकर, विठोबा घाडी, अनिल लाड आदी उपस्थित होते.
गोमंतकीय लोक सुशेगाद होत आहेत. बाहेरील लोक अनेक संधींचा लाभ घेतात. चित्रपट क्षेत्रातील आधुनिक प्रशिक्षण घेतल्यास अनेक संधी आहेत. त्याचा सर्वांनी लाभ घेणे गरजेचे आहे. लोकांनी जागरुक राहून उपलब्ध संधीचे सोने करावे.