अंतिम निवाड्यापर्यंत नवदुर्गेची मूर्ती कायम
By admin | Published: April 21, 2016 01:43 AM2016-04-21T01:43:16+5:302016-04-21T01:47:04+5:30
फोंडा : मडकईतील श्री नवदुर्गा देवीची मूर्ती बदलण्यासंदर्भात अंतिम निकाल येईपर्यंत देवस्थान समितीने मूर्ती बदलू नये. तसेच ग्रामस्थांनीही
फोंडा : मडकईतील श्री नवदुर्गा देवीची मूर्ती बदलण्यासंदर्भात अंतिम निकाल येईपर्यंत देवस्थान समितीने मूर्ती बदलू नये. तसेच ग्रामस्थांनीही देवस्थान समितीच्या व्यवस्थापकीय कामकाजात हस्तक्षेप करू नये, असा अंतरिम निवाडा फोंडा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश इर्शाद आगा यांनी बुधवारी दिला. या प्रकरणासंदर्भातील पुढील सुनावणी येत्या ७ मे रोजी ठेवण्यात आली आहे.
याबाबत बोलताना श्री नवदुर्गा प्रतिष्ठानचे वकील अॅड. अमृत कासार म्हणाले की, हा फक्त अंतरिम निवाडा आहे. अजून यासंदर्भात अंतिम निकाल यायचा असून यापुढे देवस्थान खासगी की सार्वजनिक तसेच अन्य प्रकरणावर हा खटला पुढे चालणार आहे. बुधवारच्या निकालामुळे नवदुर्गा देवीची मूर्ती अंतिम निकाल येईपर्यंत बदलता येणार नाही. तसेच ग्रामस्थांनीही देवस्थानच्या उत्सव व अन्य कार्यात दखल न देण्याचे न्यायालयाने सुचविल्याचे ते म्हणाले.
श्री नवदुर्गा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेंद्र पणजीकर यांनी या निकालाबाबत समाधान व्यक्त करताना हा मडकईकरीण देवीचा विजय असल्याचे मत व्यक्त केले. या निवाड्यामुळे मडकईत नवदुर्गेचे अस्तित्व टिकून राहाणार असून हा मडकईतील सर्व देवदेवतांचा विजय असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, न्यायालयाचा निकाल ऐकण्यासाठी सकाळपासून सुमारे हजारभर लोक फोंडा (पान ४ वर)