राज्यपालांतर्फे १४४ कॅन्सर रुग्णांना आर्थिक मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 03:55 PM2024-03-07T15:55:51+5:302024-03-07T15:58:05+5:30
राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई म्हणाले, आज कॅन्सर उपचार करण्यासाठी लाखो रुपये खर्च येत असतो
पणजी: वेळेत उपचार तसेच याेग्य आरोग्याची काळजी घेतली तर आम्ही ८० टक्के कॅन्सवर मात करु शकतो. आता अनेक आधुनिक उपचार पद्धत आली आहे, असे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी सांगितले. राज्यपाल निधीमार्फत गुरुवारी राजभवनवर राज्यपालांकडून १४४ कॅन्सर रुग्णांना आर्थिक सहाय्य देण्यात आले. यावेळी राज्यपालांचे सचिव एम आर एम राव तसेच अतिरिक्त सचिव संजीव गावस देसाई उपस्थित होते.
राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई म्हणाले, आज कॅन्सर उपचार करण्यासाठी लाखो रुपये खर्च येत असतो. यासाठी त्यांना आर्थिक आधाराची तसेच मानसिक आधाराची गरज असते. समाजिक भान म्हणून आम्ही राजभवनतर्फे काही वेळोवेळी कॅन्सर रुग्ण तसेच किडनी खराब झालेल्या रुग्णांना आर्थिक सहाय करत असतो. या लाेकांना आर्थिक पाठिंबा मिळावा हाच या मागचा मुख्य हेतू आहे. गोव्यात राज्यपालपद स्वीकारल्यापासून विविध गावांची पाहणी केली आहे. लाेकांना जवळून पाहिले आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांसाठी राजभवनवर विविध उपक्रम राबविले जातात.
सचिव एम आर एम राव म्हणाले, राजभवनतर्फे आता दिव्यांगाना आणि कॅन्सर पिढीत किडनी पिढीत तसेच अन्य विविध गरजूंना आर्थिक सहाय दिले जात आहे. राज्यपालांनी अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविले आहेत. राज्यपालांनी आपली २०० पुस्तके प्रकाशीत केली असून गाेव्यावरही त्यांनी पुस्तक लिहीले आहे. राज्यात राज्यपाल पद मिळाल्यापासून त्यांनी राज्यातील मंदिर चर्च तसेच इतर धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेत आहे.