सहा दिवसात पहिले चार्टर विमान गोव्यात दाखल, पण शॉक्सचा पत्ता नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 05:14 PM2019-09-28T17:14:01+5:302019-09-28T17:14:24+5:30
पर्यटन व्यवसाय धोक्यात : शॉक धोरणावरील स्थगिती उठविण्यासाठी उच्च न्यायालयात धाव
मडगाव: गोव्यात विदेशी पर्यटकांना घेऊन येणारे पहिले चार्टर विमान 4 ऑक्टोबरला गोव्यात दाखल होणार असले तरी विदेशी पर्यटकांचे आकर्षण असलेले शॉक्स या पर्यटन मौसमात उभे होणार की नाही हे प्रश्र्नचिन्ह कायम आहे. जोर्पयत किनारपट्टी व्यवस्थापन आराखडा सादर केला जात नाही तोर्पयत गोव्यातील शॉक्स धोरणाला हरित लवादाने स्थगिती दिल्याने हा पेच निर्माण झाला आहे.
रशियाच्या रॉयल फ्लाईटस्ची दोन चार्टर विमाने 224 प्रवाशांना घेऊन चार ऑक्टोबरच्या पहाटे दाबोळी विमानतळावर दाखल होणार आहे. 23 ऑक्टोबरपासून या कंपनीची दररोज दोन विमाने गोव्यात दाखल होणार आहेत. सध्या थॉमस कूक ही इंग्लीश पर्यटन कंपनी बंद पडल्याने गोव्यातील पर्यटन उद्योगात एकप्रकारे चिंतेचे वातावरण असताना रशियातून येणारे हे पर्यटक काही प्रमाणात दिलासा देणारे आहेत.
असे जरी असले तरी रशियन पर्यटकांमध्ये ज्यांचे आकर्षण आहे ते झोपडीवजा शॉक्स अजूनही उभे झालेले नाहीत. राष्ट्रीय हरित लवादाने 14 सप्टेंबर रोजी गोवा पर्यटन खात्याच्या शॉक धोरणाला स्थगिती दिली होती. सध्या हा प्रश्र्न न्यायप्रविष्ट अवस्थेत आहे.
गोवा पारंपारिक श्ॉकमालक संघटनेचे सरचिटणीस मान्यूएल कादरेज म्हणाले, हरित लवादाने श्ॉक धोरणाला दिलेली स्थगिती उठवावी यासाठी श्ॉक मालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही याचिका सोमवारी सुनावणीस येणार आहे. आम्हाला ही स्थगिती उठणार अशी आशा आहे असे ते म्हणाले.
105 कि.मी.ची किनारपट्टी लाभलेल्या गोव्यात सुमारे 365 श्ॉक प्रतिवर्षी उभारले जातात. पावसाळ्यात हे श्ॉक मोडले जातात आणि ऑक्टोबरचा पर्यटन मौसम सुरु होण्यापूर्वी ते उभारले जातात. मात्र राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशामुळे सध्या प्रक्रियाच बंद पडली आहे. यासाठी आम्ही सरकारला दोष देऊ शकत नाही. कारण सरकारने वेळीच धोरण जाहीर केले होते. आता आम्हाला केवळ उच्च न्यायालयावर भरोसा आहे अशी प्रतिक्रिया श्ॉकमालक कल्याण सोसायटीचे अध्यक्ष क्रूझ कादरेज यांनी व्यक्त केले. मागच्या पर्यटन मौसमात रशियाहून गोव्यात 292 रशियन चार्टर विमाने आली होती.
इंग्लंडमधून पर्यायी व्यवस्था
गोव्यात सर्वात जास्त पर्यटक इंग्लंडमधून येतात. मात्र यावेळी थॉमस कूक ही ब्रिटीश कंपनीच बंद पडल्याने लाखो ब्रिटीश पर्यटकांचे गोव्यातील बुकींग रद्द झाले आहे. या परिस्थितीत एअर इंडियाद्वारे पर्यायी व्यवस्था होणो शक्य आहे का याची चाचपणी सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी ट्रॅव्हल अॅण्ड टुरिझम असोसिएशन गोवा व एअर इंडियाच्या प्रतिनिधीबरोबर पर्यटन सचिव जे. अशोककुमार यांची बैठक झाली. थॉमस कूकची जी विमाने रद्द झाली आहेत ती एअर इंडियाद्वारे भरुन काढता येणो शक्य आहे का यावर चर्चा झाली. काही खासगी विमान कंपन्या ब्रिटनमधून पर्यटकांना गोव्यात घेऊन येऊ शकतील का हेही तपासून पाहिले जात आहे.