नवीन कायद्याअंतर्गत पहिला गुन्हा शहाळे विक्रेत्यावर, पणजीतील घटना 

By वासुदेव.पागी | Published: July 1, 2024 03:43 PM2024-07-01T15:43:27+5:302024-07-01T15:43:34+5:30

भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष कायदा हे तीन नवीन फौजदारी कायदे कायद्यात लागू होतात.

First offense under new law against Shahale vendor | नवीन कायद्याअंतर्गत पहिला गुन्हा शहाळे विक्रेत्यावर, पणजीतील घटना 

नवीन कायद्याअंतर्गत पहिला गुन्हा शहाळे विक्रेत्यावर, पणजीतील घटना 

पणजी : देशात नव्याने लागू करण्यात आलेल्या भारतीय न्यायासाठी नवीन दंड संहिता कायद्याअंतर्गत पहिला गुन्हा पणजी पोलिसांनी एका शहाळी विक्रेत्याविरूद्ध नोंद केला आहे. पणजीत वाहतुकीस अडथळा आणल्याबद्दल  हातगाडीवाला निसार याच्याविरुद्ध कलम २८५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. निसार (53) जाणूनबुजून वाहतूक अडवून हातगाडी चालवीत होता असा त्याच्यावर ठपका आहे. तो लोकांची गैरसोय करत होता असे म्हटले आहे.   

भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष कायदा हे तीन नवीन फौजदारी कायदे कायद्यात लागू होतात. हे कायदे अनुक्रमे वसाहतकालीन भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदे १ जुलै पासून लागू झाले आहेत. दरम्यान नवीन कायद्याच्या अंतर्गत तक्रार नोंदवण्यासाठी सर्व अधिकारी इतर पोलीसांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यात अधिकारी म्हणून काम पाहणारे तसेच उपनिरीक्षक व हेडकांस्टेबलही आहेत.  या प्रकरणी त्यांना सर्व माहिती देण्यात आली आहे.  तसेच  पोलीस मुख्यालयातून याबाबत खबरदारी घेण्यात येत आहे. योगायोगाने देशातही  एका हातगाडी वाल्याविरुद्धच पहिल्या गुन्हाची नोंद करण्यात आली आहे.  नवी दिल्ली येथे हा गुन्हा नोंद झाला आहे.

Web Title: First offense under new law against Shahale vendor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा