47 व्या कोकणी नाट्य स्पर्धेत 'शी कावळो आपुडला' प्रथम पारितोषिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2023 02:55 PM2023-03-14T14:55:57+5:302023-03-14T14:56:52+5:30
भोम येथील युवा एकवट संस्थेच्या लिअरान जगचे काय मरचे या नाटकाला सादरीकरणाचे दुसरे ,तर अंत्रुज घुडयो बांदोडा यांच्या हिडिंबा नाटकाने तिसरे बक्षीस मिळवले आहे.
- अजय बुवा
फोंडा : कला अकादमीने आयोजित केलेल्या 47 व्या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून पंचवाडी येथील एकदंत कला संघ संस्थेने सादर केलेल्या शी कावळो आपुडला या नाटकाने प्रथम बक्षीस मिळवले आहे. भोम येथील युवा एकवट संस्थेच्या लिअरान जगचे काय मरचे या नाटकाला सादरीकरणाचे दुसरे ,तर अंत्रुज घुडयो बांदोडा यांच्या हिडिंबा नाटकाने तिसरे बक्षीस मिळवले आहे.
श्री नागेश महालक्ष्मी प्रसादिक नाट्य समाज बांदिवडे यांच्या 'कुत्रे' व रसरंग उगवे यांच्या वेटिंग फॉर गोदो या नाटकांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले आहेत. सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे दिग्दर्शन प्रथम- दीपराज सातार्डेकर(शी कावळो आपूडला),द्वितीय -वैभव नायक(लिअरान जगचे काय मरचे)तृतीय -अनंत कामत बांबोळकर( हिडिंबा). अभिनय पुरुष प्रथम साई कलंगुटकर, द्वितीय- अभिषेक नाईक प्रमाणपत्रे- कुणाल मधुकर बोरकर, प्रसन्न कामत ,सचिन चौगुले, केदार मिस्त्री, गौतम दामले, प्रेमानंद गुरव, राजेंद्र चारी, संतोष नाईक, सिद्धेश मराठे.
वैयक्तिक अभिनय (स्त्री) प्रथम- हर्षला पाटील बोरकर, द्वितीय -शेफाली नायक .प्रमाणपत्रे दीक्षिता मांद्रेकर, नेहा गुडे, सेजल दिवकर, साईशा शिरोडकर ,रेश्मा नायक, समृद्धी वंगणकर ,सरिता माशेलकर, प्रणिता काणकोणकर, तनश्री राणे,मानसी केरकर. नेपथ्य प्रथम -दिपराज सातार्डेकर द्वितीय -मोहित विश्वकर्मा. वेशभूषा प्रथम- अनिकेत नायक, द्वितीय- प्रियांका गावस. प्रकाश योजना -प्रथम- विशाल गावकर, द्वितीय- वैभव नायक.
रंगभूषा प्रथम- खुशबू कवळेकर ,द्वितीय- एकनाथ नाईक. पार्श्व संगीत प्रथम -चेतन खेडेकर, द्वितीय- तानाजी गावडे. खास स्पर्धेसाठी लिहिलेली संहिता प्रथम-दीपराज सातार्डेकर ,द्वितीय- डॉ. तन्वी कामत बांबोळकर. खास स्पर्धेसाठी अनुवादित नाटक प्रथम- वसंत भगवंत सावंत. शिवनाथ नाईक, नीता देसाई व देविदास आमोणकर यांनी सदर स्पर्धेचे परीक्षण केले होते.