गोव्यातून मासळी निर्यात बंद केल्यास मच्छिमार व्यवसाय संकटात पडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 08:25 PM2018-11-13T20:25:12+5:302018-11-13T20:25:29+5:30

गोव्यात मासळी निर्यात बंद झाल्यास मासळी व्यवसायावर त्याचे परिणाम होण्याची भीती स्वत ट्रॉलर मालक असलेले राज्याचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी केली होती.

 Fisheries business will be in trouble if fisheries exports stop in Goa | गोव्यातून मासळी निर्यात बंद केल्यास मच्छिमार व्यवसाय संकटात पडणार

गोव्यातून मासळी निर्यात बंद केल्यास मच्छिमार व्यवसाय संकटात पडणार

googlenewsNext

मडगाव - गोव्यात मासळीतील फॉर्मेलिनच्या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारने मासळी आयातीवर बंदी घातली असताना आता दुसरीकडे मासळी निर्यातीवरही बंदीची मागणी होत असताना, निर्यात बंद झाल्यास मासळी व्यवसायावर त्याचे परिणाम होण्याची भीती स्वत ट्रॉलर मालक असलेले राज्याचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी निर्यातावर बंदीची मागणी करण्यांनी गोव्यातील ट्रॉलर मालकांचे ट्रॉलर स्वतहा विकत घ्यावेत असा सल्ला दिला आहे.

आज गोव्यातील मडगाव येथे आलेमाव यांनी पत्रकार परिषद घेतली. गोव्यातून राणो, बाळे व टुना ही मासळी मुबलक प्रमाणात उपलब्ध असते व हीच मासळी शंभर टक्के विदेशात निर्यात केली जाते. गोव्यात ही मासळी कुणी खातही नाही अशी माहितीही आलेमाव यांनी यावेळी दिली.

मासळी आयातीवर सरकारच्या बंदीचेही आलेमाव यांनी स्वागत केले. राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणो तसेच नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांच्या निर्णयाचेही आपण स्वागत करीत असल्याचे ते म्हणाले. लोकांचे आरोग्य महत्वाचे आहे. फॉर्मेलिन म्हणजे एकाप्रकारे वीषच होय. लोकांच्या आरोग्याकडे खेळू नये. आयातीवर बंदी उठविण्याची मागणी सरकारातील काही घटक करीत एफडीएने घालून दिलेल्या नियम व अटीचे पालन करुन मासळी आयात करण्यात हरकत नाही. मात्र शेवटी हा निणर्य लोकांना विचारुनच घ्यावा लागणार आहे असेही ते म्हणाले.

गोव्यातील घाउक मासळी मार्केट परप्रांतियाच्या ताब्यात गेले आहेत. हे मार्केट नीज गोवकारांच्या हाती असले पाहिजे अशी मागणीही आलेमाव यांनी केली. गोव्यात जेव्हा पावसाळयात मासेमारी बंदी असते तेव्हा आंध्र प्रदेश व तामिळनाडू येथे मासेमारीचा मौसम असतो, त्या ठिकाणी मोठ मोठया शितपेटया आहेत. मात्र या राज्यात पाण्याची टंचाई असल्याने तेथे बर्फ उपलब्ध होण्यास अडचणी असतात. रंगविहरीत फॉर्मेलिनचे पाणी या माशांवर टाकले जात असल्याचा दावाही आलेमाव यांनी केला.

गोवा राज्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मासळी आयातावर बंदीची मागणी केली होती. आपणही ती केली होती. आज काँग्रेसचे काही सदस्य मासळी आयात बंद करा असे सांगताना दुसरीकडे काहीजण आयात सुरु करा म्हणतात. कॉग्रेस या फॉर्मेलिन इश्युचे राजकारण करु बघत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मडगावच्या घाउक मासळी मार्केटमध्ये फॉर्मेलिनयुक्त मासळी मिळाली होती. त्या दोषींवर कारवाई होणो गरजेचे असून, त्यांना अटक करा अशी मागणीही केली आहे.

Web Title:  Fisheries business will be in trouble if fisheries exports stop in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.