गोव्याहून गुजरातकडे जाणारी ५ लाखांची दारु पत्रादेवी येथे जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 08:18 PM2019-05-01T20:18:38+5:302019-05-01T20:18:43+5:30
निवडणुकीच्या धामधुमीत गोव्याहून गुजरातकडे नेली जाणारी सुमारे ५ लाख ३0 हजार रुपये किमतीची दारु अबकारी खात्याच्या भरारी पथकाने बुधवारी पत्रादेवी चेक नाक्यावर पकडली
पणजी - निवडणुकीच्या धामधुमीत गोव्याहून गुजरातकडे नेली जाणारी सुमारे ५ लाख ३0 हजार रुपये किमतीची दारु अबकारी खात्याच्या भरारी पथकाने बुधवारी पत्रादेवी चेक नाक्यावर पकडली.
लाकडी फर्निचरचे पॉलिश असल्याचे भासवून दारुची तस्करी केली जात होती. देशी बनावटीच्या विदेशी दारुच्या ९६0 बाटल्या तसेच बीयरचे १२00 कॅन जप्त करण्यात आले. या प्रकरणी अधिक तपास चालू आहे.
१0 मार्च रोजी गोव्यात लोकसभेच्या दोन जागांसाठी आणि विधानसभेच्या तीन जागांसाठी (पोटनिवडणूक) निवडणुका जाहीर झाल्या. त्यानंतर पणजी विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर झाली. केवळ पणजीची निवडणूक बाकी राहिलेली आहे. ती येत्या १९ रोजी होणार आहे. निवडणूक आचारसंहिता काळात आतापर्यंत रोख, मद्य, ड्रग्स याचा वापर केला जाऊ नये यासाठी करडी नजर ठेवण्यात आली. या काळात अबकारी खात्याच्या अधिकाºयांनी २२२ प्रकरणात गुन्हे नोंदविले आणि ५ कोटी ५९ लाख रुपये किमतीची ६८,0२८ लिटर दारु जप्त केली.