विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांचे येत्या अधिवेशनात पाच खाजगी ठराव

By किशोर कुबल | Published: January 25, 2024 04:13 PM2024-01-25T16:13:06+5:302024-01-25T16:13:41+5:30

सभापती रमेश तवडकर यांनी ते काम करतात दाखल करुन घेतले तर ते शुक्रवारी ९ फेब्रुवारी रोजी चर्चेसाठी येतील.

Five private resolutions of opposition leader Yuri Alemav in the coming session | विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांचे येत्या अधिवेशनात पाच खाजगी ठराव

विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांचे येत्या अधिवेशनात पाच खाजगी ठराव

पणजी : २ फेब्रुवारीपासून सुरु होणार असलेल्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी पाच खाजगी ठराव मांडणार आहेत. पक्षांतर विरोधी कायदा, एसटींना राजकीय आरक्षण, दुहेरी नागरिकत्व, आधी ठराव त्यांनी सादर केले आहेत. सभापती रमेश तवडकर यांनी ते काम करतात दाखल करुन घेतले तर ते शुक्रवारी ९ फेब्रुवारी रोजी चर्चेसाठी येतील. 

पक्षांतरविरोधी कायद्यातील दुरुस्तीवरील त्यांच्या पहिल्या खाजगी सदस्य ठरावात यांनी “विलीनीकरण” ही संकल्पनाच काढून टाकण्याची आणि विधानसभेच्या बाबतीत उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी नियुक्त केलेल्या न्यायाधीशाकडे तर संसदेच्या बाबतीत  सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनी नियुक्त केलेल्या न्यायमूर्तींकडे पक्षांतरासंबधी प्रकरणांची निर्णय प्रक्रिया सोपवण्याची गरज व्यक्त केली आहे. 

केंद्रीय निवडणूक आयोगाने गोव्यातील अनुसूचित जमातींसाठी विधानसभा मतदारसंघ अधिसूचित करावेत, असे युरी यांनी त्यांच्या दुसऱ्या खाजगी सदस्य ठरावात म्हटले आहे.

भारतीयांना दुहेरी नागरिकत्व देण्याची प्रक्रिया जलद करण्याची आणि त्यादरम्यान ज्या गोमंतकीयांनी आपली पोर्तुगालमध्ये जन्म नोंदणी केली आहे पण ज्यांच्याकडे पोर्तुगीज पासपोर्ट नाही, अशा सर्वांना ओसीआय दर्जा देण्याची विनंती परराष्ट्र मंत्रालय आणि केंद्र सरकारला करण्याची शिफारस आपल्या तिसऱ्या खाजगी सदस्य ठरावात युरी यांनी केली आहे.

दरवर्षी १६ जानेवारी रोजी “अस्मिताय दिन –जनमत कौलदिन” सरकारी पातळीवर साजरा केला जावा यासाठी चौथा खाजगी सदस्य ठराव त्यांनी दाखल केला आहे. जनमत कौलामुळेच आज आपण स्वत:ला गोवा राज्याचे निवडून आलेले प्रतिनिधी म्हणू शकतो असे नमूद करुन युरी यांनी सदर ऐतिहासिक दिवसाचे स्मरण करणे ही अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचे ठरावात म्हटले आहे.

विधानसभेच्या मार्च अधिवेशनात विधवा भेदभाव, विधवा अत्याचार आणि विधवांचे अलगीकरण यावरील त्यांच्या यापूर्वीच्या खाजगी सदस्य ठरावावर चर्चा झाली असली तरी कायदा आणण्यासाठी सरकारने कोणतीही पावले उचलली नाहीत. त्यामुळे परत एकदा विरोधी पक्षनेते यांनी अन्यायकारक प्रथा रोखण्यासाठी ठराव मांडला आहे. या ठरावात नाईक-डिचोलकर कुटुंबातील कन्या डॉ. गौतमी व डॉ. प्रथमेश यांचे लग्नविधी करणाऱ्या उषा नाईक यांचा विशेष उल्लेख आहे.

Web Title: Five private resolutions of opposition leader Yuri Alemav in the coming session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा