दुबईहून तमिळनाडू जाणाऱ्या विमानेचे दाबोळीत ‘इमरजेंन्सी लँण्डींग’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 10:02 PM2023-03-24T22:02:34+5:302023-03-24T22:02:45+5:30
इस्पितळात पोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्याची माहीती दाबोळी विमानतळ पोलीसांनी दिली.
वास्को:
शुक्रवारी (दि.२४) दुबई हून त्रिची, तमिळनाडू येथे जाणाºया इंडीगो एअरलाईंन्स विमानातील एका ६७ वर्षीय महीला प्रवाशाची अचानक प्रकृती बिघडल्याने तिच्यावर उपचार करण्यासाठी त्या विमानाचे गोव्याच्या दाबोळी विमानतळावर ‘इमरजेंन्सी लेंण्डींग’ करावे लागले. त्या विमानातून प्रवास करत असलेल्या तमिळनाडू येथील लीला जोझेफ नामक वृद्ध महीला प्रवाशाची विमान उड्डाणात असताना अचानक प्रकृती बिघाडल्याने विमान त्वरित दाबोळी विमानतळावर उतरवून तिला इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र इस्पितळात पोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्याची माहीती दाबोळी विमानतळ पोलीसांनी दिली.
दाबोळी विमानतळ पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार शुक्रवारी संध्याकाळी ती घटना घडली. दुबईहून त्रिची, तमिळनाडू येथे जात असलेल्या इंडीगो एअरलाईंन्स विमानातून लीला जोझेफ नामक वृद्ध महीला तिच्या कुटूंबातील इतर सदस्यांबरोबर प्रवास करत होती. ते अंतराष्ट्रीय विमान जेव्हा त्रिची जाण्यासाठी उड्डाणात होते, त्यावेळी अचानक लीला जोझेफ हीच्या प्रकृतीत बिघाड झाला. विमानातील एका वृद्ध महीला प्रवाशाची प्रकृती अचानक बिघाडली असून तिला उपचाराची गरज असल्याचे समजताच विमानाची ‘इमरजेंन्सी लेंण्डींग’ करून ते दाबोळी विमानतळावर उतरविण्यात आले.
प्रकृतीत बिघाड झालेल्या लीला जोझेफ ह्या वृद्ध महीलेला आणि तिच्याबरोबर असलेल्या कुटूंबातील इतर सदस्यांना दाबोळीवर उतरविल्यानंतर लीला जोझेफ यांना त्वरित उपचारासाठी चिखली उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले. मात्र इस्पितळात आणण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्याची माहीती दाबोळी विमानतळ पोलीसांकडून प्राप्त झाली. मरण पोचलेल्या लीला यांची काही वर्षापूर्वी ‘एंन्जोप्लास्टी’ झाल्याची माहीती पोलीसांना चौकशीवेळी प्राप्त झाली असून ती ह्रदय रुग्ण असल्याचे त्यांना चौकशीत समजले आहे. तिचा मृत्यू ह्रदय विकाराच्या झटक्याने झाला असावा असा संशय दाबोळी विमानतळ पोलीसांकडून व्यक्त केला जात आहे. मरण पोचलेल्या लीला हीचा मृतदेह मडगाव येथील जिल्हा इस्पितळाच्या शवगृहात पाठवून दिला आहे. दाबोळी विमानतळ पोलीस अधिक तपास करित आहेत.