शिरगावात भाविकांचा महापूर; लईराई देवीच्या जत्रोत्सवाला मंगलमय वातावरणात प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2024 11:30 AM2024-05-13T11:30:45+5:302024-05-13T11:31:20+5:30

भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्याने मंगलमय वातावरणात या उत्सवाला पहाटेपासून प्रारंभ झाला.

flood of devotees in shirgaon festival of lairai devi begins in auspicious atmosphere | शिरगावात भाविकांचा महापूर; लईराई देवीच्या जत्रोत्सवाला मंगलमय वातावरणात प्रारंभ

शिरगावात भाविकांचा महापूर; लईराई देवीच्या जत्रोत्सवाला मंगलमय वातावरणात प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क डिचोली: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगाव येथील देवी लईराईच्या प्रसिद्ध अत्रोत्सवानिमित रविवारी दिवसभर भक्तांच्या जणू पूर आल्यागत तुईब गर्दी झाली होती. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्याने मंगलमय वातावरणात या उत्सवाला पहाटेपासून प्रारंभ झाला.

पहाटेपासून हजारो भाविकांनी देवदर्शन तसेच होमकुंडाला प्रदक्षिणा घालून आपल्या सुखी संसारासाठी देवीच्या चरणी प्रार्थना केली. मेले पाच दिवस व्रत स्वीकारून उपवास व सोवळे पालन करून मंगलमय वातावरणात देवीची भक्ती करीत असलेले धौड सकाळपासून शिरगाव येथे दाखल झाले. त्यांनी सर्वप्रथम पवित्र तळीत स्नान केले, गळ्यात मोगऱ्याच्या फुलांच्या माळा परिधान करून देवीचे दर्शन घेतले, वैशिष्ट्यपूर्ण गौंडा बांधलेली बेतकाठी, सौवळे नेसून धोंडांनी देवीच्या ठिकाणी नतमस्तक झाले. पारंपरिक नृत्य करून देवीचा जयजयकार धोंडांनी केला.

भाविक व व्रतस्थ धोंड शिरगावच्या दिशेने दाखल होत असल्याने अस्नोडा ते शिरगाव रस्त्यावर भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. मोगऱ्याच्या कल्यांची मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने विविध राज्यांतील महिला, पुरुष यांनी ठिकठिकाणी ते उपलब्ध केले. या विक्रीतून लाखीची उलाढाल झाली. मोठ्या प्रमाणात फेरी भरलेली असून संख्येने भाविक उपस्थिती लावणार आहेत.

शिरगाव जत्रा ही गोमंतकीयांचा जिव्हाळ्याचा, श्रद्धेचा विषय असल्याने प्रत्येक घरातून किमान एक माणूस तरी पाच दिवसांत हजेरी लावतोच, असे भाविकांनी सांगितले.

शनिवारी धोंडगणांनी व्हडले जेवण करून गावातील लोकांनाही या उत्सवात सहभागी करून घेताना फराळ दिला. लहान मुले तसेच ज्येष्ठ महिला सोवळे पालन करून अग्निदिव्यासाठी सज्ज होत असतात. अग्निदिव्य साकारण्यासाठी होमकुंड रचून शनिवारी रात्री पूर्ण करण्यात आले. रविवारी संपूर्ण दिवस रात्र लाखी भाठिकांनी दर्शन घेतले. मध्यरात्री अग्निदिव्य साकारण्यासाठी घोड स्प्ज झाले होते. प्रशासनाने वाहतूक व्यवस्था, पाणी व्यवस्था तसेच इतर व्यवस्थेबाबत तसेच पार्किंग व्यवस्था, लोकांची सुरक्षा, गर्दी टाळून योग्य पद्धतीने दर्शन घेता यावे, यासाठी चोख बंदोबस्त करण्याच्यादृष्टीने तयारी केली होती.

पहाटेपासुन धार्मिक विधींना प्रारंभ पहाटे पूजा धार्मिक विधी झाले, त्यानंतर चिरा (उत्सव मूर्ती) मोडाच्या डोक्यावर ठेवल्यानंतर ही चिरा देवीच्या मुद्देर या आदी स्थानावर मंदिरात जाण्यासाठी निघते, त्यानंतर दुपारी ही चिरा पुन्हा आदी स्थानावरून मंदिरात येण्यासाठी निघते. रात्री उशिरा अग्निदिव्य साकारण्याची तयारी होत असते, गोवा व इतर भागांतून हजारो भाविक या असल्याने संपूर्ण गावात उत्साही वातावरण आहे. हजारो व्रतस्थ धोंड मध्यरात्री अग्निदिव्य साकारत असून, हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची तुडुंब गर्दी होती. या ठिकाणी चौख व्यवस्था व लोकांना अग्निदिव्य प्रत्यक्षात पाहता यावे, यासाठी विशेष सोय करण्यात देवस्थान समिती व प्रशासनाचे पदाधिकारी कार्यरत झाले होते.

देवस्थान समिती, प्रशासनाकडून चोख व्यवस्था

जत्रोत्सवानिमित लाखो भाविक पाच दिवस हजेरी लावत असल्याने त्यांची चोख व्यवस्था करता यावी, गर्दी वाळावी, यासाठी अनेक उपाययोजना व जय्यत तयारी केल्याचे देवस्थान समितीचे अध्यक्ष गणेत गावकर यांनी सांगितले.

मोगरीचा गावात दरवळ

मोगरीच्या कळ्यांना या उत्सवात मोठी मागणी असते. त्यासाठी अनेक भागांतून शेकडो लोक मोगद्याचे कळे विक्रीसाठी गावात दाखल झाल्याने फुलाचा दरवळ सर्वत्र पसरला आहे.

गोबी मंच्युरियन स्टॉल्सना बंदी

या ठिकाणी भाविकांना कोणताही वास होऊ नये, यासाठी प्रशासन व देवस्थान समिती विशेष प्रयत्न घेत आहेत. पाढता उष्मा लक्षात घेता अनेक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले जत्रोत्सवात गोबी मंच्युरियन स्टॉल्सना पूर्णपणे बंदी घातल्याची माहिती गणेश गावकर यांनी दिली. पोलिस, वाहतूक अधिकारी उपजिल्हाधिकारी, मामलेदार आदी सर्व प्रशासनातील अधिकायांनी जवेनिमित गैरसोय होऊ नये, चासाठी सर्प व्यवस्था केली आहे.
 

Web Title: flood of devotees in shirgaon festival of lairai devi begins in auspicious atmosphere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा